
खाकी म्हणजेच माणुसकी.....
लोअरपरळ येथे रस्त्यावर डिझेल पडले असता कर्तव्यावर असणारे वरळी डिव्हिजनचे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल श्री. जावेद नवलगी आणि त्यांना मदत करणारे एम. एस. एफ. जवान व वाहतूक वॉर्डन यांच्या मदतीने तात्काळ मातीचा बंदोबस्त करून डिझेल पडलेल्या रोडवर माती पसरवण्यात आली.
वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल जावेद नवलगी आणि त्यांच्या टीमने घटनेची ताबडतोब दखल घेऊन पुढील होणारा अपघात टाळला.
मुंबई पोलिसांमध्ये असेच हुशार पोलीस जवानांची गरज आहे आणि मुंबई पोलीस हे वेळोवेळी दाखवून देतात.
यालाच म्हणतात खाकीतली माणुसकी....