Breaking News

शिव शंभू सेवा समितीच्यावतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा नागरी सत्कार

शिव शंभू सेवा समितीच्यावतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा नागरी सत्कार

शिव शंभू सेवा समितीच्यावतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा नागरी सत्कार

कल्याण : कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळाला आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यामुळे दुर्गेश बागुल व भाजपा कल्याण पुर्व मंडल सरचिटणीस मा.ग्रामपंचायत सदस्य नितेश म्हात्रे यांच्या सौजन्याने शिव शंभू सेवा समितीच्या माध्यमातून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच आमदारांनी साईप्रसन्न कॉलनी येथे 100 मीमी व्यासाची पिण्याची 500 फुट पाईपलाईन स्वखर्चाने टाकून दिली.


 याप्रसंगी समिती अध्यक्ष शरद काळे, राजू सांगळे, स्वाती मुळीक, जयश्री सानप, दत्ता मोरे, अनिल साळुंखे (शिवसेना विभाग प्रमुख), रोहेशं शिरधनकर, आप्पा शेळके, दत्ता निकम, चुंनिलाल कुमावत, श्वेता गोळे, गौरी म्हस्के, स्वाती साबळे, राजेन्द्र काजरोलकर, दिपक सानप, किरण नागरे, अंधू म्हस्के, बबन पाटील, पूनम बागुल, सुनिता काळे व शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

अत्यंत दिमाखदार पद्धतीने जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत जेसीबी ने हार घालत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आमदार सुलभा गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. या नंतर 20 ते 25 रहिवासी सोसायटयातर्फे आमदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना नितेश म्हात्रे यांनी मांडत संपूर्ण चिंचपड्याचा विकास करण्यासाठी माजी आमदार गणपत गायकवाड यांचे महत्तवपुर्ण योगदान असुन विकासाच्या जोरावरच आमदारांनी हि निवडणुक जिंकली व मतदारांनी पाठबळ दिले.  

कल्याण पूर्वच्या जनतेने दहशतीला नाकारत महिला शक्तीला साथ दिल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार दुर्गेश बागुल यांनी मांडले व लाडू वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Most Popular News of this Week