
सदैव तत्पर मुंबई पोलीस...
सोमवार दिनांक १८/०८/२५ : मुंबईत आज बरेच ठिकाणी पावसाने कहर केला मुंबईतल्या सकल भागात चेंबूर, दादर हिंद माता, सायन गांधी मार्केट, माटुंगा, मिलन सबवे अंधेरी, सांताक्रुज अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं. या मुसळधार पावसाने अगदी
मुंबईची तुंबापुरी केली होती. त्यातच शासनाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला. शाळा सोडायचे आदेश शासनाने दिल्यानंतर एकच झुंबड उडाली. शाळेची बस पावसात अडकल्यामुळे लहान मुलांची जबाबदारी मुंबई पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम....