मुंबई पोलीस, सामाजिक बांधिलकी
गोपाळ नगर, वरळी येथे कर्तव्यावर असणारे वरळी डिव्हिजनचे वाहतूक पोलीस हवालदार जावेद सय्यद नावलगी (पो. ना. क्रं : १५०७३५) यांनी आज कर्तव्य करत असता एक माणुसकीच उत्तम उदाहरण दिलं ट्रॅफिक वॉर्डन हरिप्रकाश धोबी हे भर पावसात भिजत असता वाहतूक पोलीस हवालदार जावेद नावलगी यांनी आपल्याकडचा रेनकोट घालून आपल्यातली माणुसकी दाखवून दिली.
मुंबई पोलीस हे वेळोवेळी गुन्हेगारांशी दोन हात करता करता माणुसकीच दर्शन ही घडवत असतात. हवालदार जावेद नवालगी यांनी कर्तव्यांबरोबर एक सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. अशा पोलीस जवानांमुळे मुंबई पोलिसांचं नाव अधिकाधिक उंचावत आहे त्यांच्या या कार्याला सॅल्यूट.....
