वांद्रे पोलीस ठाणे - खुनाचा प्रयत्न...
दिनांक २०/०६/ २०२६ रोजी १७.३० वा. च्या सुमारास फिर्यादी शेहबाज मेहबूब शेख वय वर्ष २९ धंदा डिलिव्हरी बॉय राहणार वांद्रे पश्चिम मुंबई, यांनी वापरत असलेली काळया रंगाची ॲक्सिस मोटर सयकल बीएमसी मैदानाच्या समोर, रस्त्यावर पार्क केली असता. त्याच्या बाजूला राहणारा त्याचा ओळखीचा मित्र वय वर्षे २५, अटक आरोपी याने त्याच्याकडे चालवण्याकरिता मोटरसायकल मागितली. फिर्यादी याने नकार दिले असता त्यांनी त्याच्याबरोबर वाद केला. त्या वादात अटक आरोपी याने हाताने त्याला मारहाण केली त्या मारहाणी मध्ये फिर्यादी याच्या नाकातून रक्त येऊ लागले.
त्यानंतर फिर्यादी भाभा हॉस्पिटल कडे जात असता अटक आरोपी याने बीएमसी गार्डनच्या रस्त्यालगत फिर्यादीची अडवणूक करून. त्याच्या अंगावर धावून गेला व अटक आरोपी यांनी आपल्याकडील कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता. फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजाला कोयत्याचा वार झाला व जखम झाला. म्हणून फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून २१/०६/२०२६ रोजी ही गु. र. क्रं. १२११/२६ कलम १०९,११५ (२), ३५२, ३५१(३), बीएनएस २०२३ सहकलम ३७ (१) (अ), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. वांद्रे पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
Most Popular News of this Week
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई
मुंबई पोलीस उपायुक्त दक्षिण परिमंडळ ०२, मुंबईगावदेवी पोलीस ठाणे, ...
वांद्रे पोलीस ठाणे - खुनाचा...
दिनांक २०/०६/ २०२६ रोजी १७.३० वा. च्या सुमारास फिर्यादी शेहबाज...
