पोलीस आयुक्त बृहन्मुंबई
: आदेश :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत
१) ज्या अर्थी दहशतवादी / राष्ट्र विरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट पॅराग्लायडर चा वापर करून त्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि त्याद्वारे व्हीव्हीआयपिना लक्ष करू शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू शकतात आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात.
२) ज्या अर्थी अशा ड्रोन रिमोट कंट्रोल, मायक्रो लाईट रिमोट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडद्वारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात अशा घटकांच्या कारवाया, ज्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक आहे.
३) म्हणून मी अकबर पठाण पोलीस उप-आयुक्त (अभियान) , बृहन्मुंबई आणि कार्यकारी दंडाधिकारी मला कलम १६३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वेये प्रदान केलेल्या अधिकाराद्वारे ड्रोन रिमोट कंट्रोल, मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर्स, पॅरा मोटर्स हॅन्ड ग्लाइडर्स, हॉट बलून इत्यादी, च्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश पुढील ३० दिवसांसाठी म्हणजे १२/०६/२०२६ ते ११/०७/२०२६ पर्यंत देत आहे. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपायुक्त (अभियान) बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगी करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.
४) हा आदेश दि. १२/०६/२०२६ रोजी ००.०१ पासून दिनांक. ११/०७/२०२६ रोजी २४.०० वाजेपर्यंत त्यापूर्वी मागे घेतल्याशिवाय लागू राहील.
५) या आदेशाचे उल्लंघन करणारे कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वेये दंडनीय असेल.
६) सर्व संबंधितांना वैयक्तिक रित्या बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, या द्वारे एकतर्फी आदेश पारित करण्यात आला आहे. प्रसार माध्यमाद्वारे सर्व पोलीस ठाणे, सर्व स. पो. आ., सर्व पो. उ. आ. महानगरपालिका वार्ड ऑफिस, तहसील ऑफिसच्या नोटीस बोर्ड वर प्रति चिकटवून प्रकाशित केले जाईल.
(अकबर पठाण )
पोलीस उप आयुक्त (अभियान)
तथा कार्यकारी दंडाधिकारी
बृहन्मुंबई
Most Popular News of this Week
अमली पदार्थ विरोधी पथक,...
अमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा यांनी एन डी पी एस 1985 कायद्यान्वये...
