
गोंदेगावात गुटख्यावर धाड;-सोयगाव पोलिसांची कारवाई
गोंदेगावात गुटख्यावर धाड;-सोयगाव पोलिसांची कारवाई
सोयगाव;-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांनी गोंदेगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची गोणी विणा परवाना बाळगताना एकास रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे
जोगराम हरिजीरामजी चौधरी (रा गोंदेगाव ता सोयगाव ) असे आरोपीचे नाव असून हा गोंदेगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असलेली गोणी ताब्यात व कब्जात बाळगताना सोयगाव पोलिसांना निवडणुकीच्या गस्ती दरम्यान मिळून आला त्याची तपासणी केली असता गोणीत चार हजार नऊशे ९५ रु चे विमल पान मसालाची २७ पाकीट तसेच ८१० रु चे छोटी २७ पाकीट असा एकूण पाच हजार आठशे पाच रु चा विमल गुटखा हस्तगत केला आहे
त्याचे विरुद्ध २२९/२०२४ कलम २२३,२७५,बी एन एस सह कलम ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक पंकज बारवाल ,उपनिरीक्षक रज्जाक हुसेन शेख ,गजानन दांडगे,विकास दुबिले, जमादार राजू बर्डे,दिलीप पवार,म्हस्के,आदींच्या पथकांनी केली आहे तसेच दुसऱ्या एका कारवाई मध्ये निंबायती फाट्यावर निवडणुकी च्या गस्तीत एका मोकळ्या जागेत बाळू राठोड याचा ताब्यातून विनापरवाना देशी दारूच्या १६ बाटल्या एकूण किंमत १६०० रु पकडून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई जमादार राजू बर्डे,रवींद्र तायडे,संजय सिंघम,अजय कोळी आदींच्या पथकांनी केली आहे दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांची दोन विशेष पथके सोयगाव हद्दीत गस्त घालून अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करत असल्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सांगितले....