दहशतवादी विरोधी पथक, पुणे

दहशतवादी विरोधी पथक, पुणे

अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली दहशतवादी विरोधी पथकाने पुण्यातील एका तांत्रिक याला (आयटी) अटक केली

   जुबेर हंगेरगेकर 35 वर्षाचा तरुण मूळचा सोलापूरचा सात ते आठ वर्ष पुण्यात नोकरीसाठी वास्तव्यास पुण्यातील कल्याणी नगर भागात आयटी कंपनीत नोकरी करीत होता जवळ जवळ 25 लाखांचा वर्षाचा पॅकेज म्हणजे महिना जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये पगार अशा या व्यक्तीच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना अल कायदा या संघटनेशी संबंधित काही माहिती मिळाली प्राथमिक माहिती मिळता पुणे पोलिसांनी कोंढवा या भागात छापा टाकला असता त्यांना छाप्यात या व्यक्तीचा लॅपटॉप सापडला. त्या व्यक्तीचा लॅपटॉप पुणे पोलिसांनी फॉरेन्सिक तपासा करिता पाठवला असता पोलिसांना त्यात अतिशय संशयित व गंभीर माहिती सापडली त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीस 27 ऑक्टोबरला पुणे रेल्वे स्टेशनला चेन्नईहून आलेल्या ट्रेनमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांना जुबेर च्या लॅपटॉप मध्ये अल कायदा इन्स्पायर मॅगझिन मटेरियल सापडलं. एके 47 बंदूक कशी चालवणे, बॉम्ब कसा बनवणे इत्यादी माहिती त्या मॅगझिन मध्ये दिली होती. त्याच्या लॅपटॉप मध्ये ओसामा बिन लादेन ची भाषण जी उर्दूमध्ये ट्रान्सलेट केली होती. 

      भारताच्या भूमीत राहून कल्याणी नगर महाराष्ट्रात एक व्यक्ती वर्षाला 25 लाख  पगार घेऊन देशाच्या विरोधात काम करतोय ही आश्चर्याची गोष्ट आहे. इस्लामला वाचवण्यासाठी ही व्यक्ती तरुणांची माथी भडकवत आहे या व्यक्तीचे लग्न झालं असून त्या व्यक्तीस दोन मुलं आहेत त्याचा  परिवार म्हणजे त्याचा भाऊ कोंडव्यामध्ये इतर भागात राहत आहे. हे सर्व असताना या व्यक्तीस दहशतवाद्यांशी संबंध का ठेवावे लागले याचे उत्तर पोलीस तपासातच मिळेल. 

   सध्या तरी त्या व्यक्तीस दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली UAPA म्हणजे (अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट) या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. तसेच सोलापूर जवळच्या वळसन या गावात एका शाळेत


मार्गदर्शन करण्यासाठी गेला.  अशी माहिती समजते त्या शाळेत कोणत्या प्रकारच  मार्गदर्शन केले त्याची चौकशी पोलीस करीत आहेत अशा अनेक गोष्टी तपासानंतर समोर येतील हे रॅकेट महाराष्ट्राला समजणे गरजेचे आहे कारण लोक त्यामुळे जागरूक होतील. महाराष्ट्र पोलीस, पुणे  व दहशतवादी विरोधी पथक, पुणे यांनी खूप मोलाची कामगिरी केली अशा या हुशार धाडसी व कर्तबगार पोलीस जवानांमुळे अशा देश विघातक वृत्ती समोर येतात. सर्वच काम पोलीस करतील अशा गैर समजूतीमध्ये राहू नका या देशाचा सजग नागरिक म्हणून तुमच्या आजूबाजूला अशा वृत्ती आढळून आल्यास आपण तात्काळ पोलिसांची संपर्क करून माहिती द्या कारण दहशतवादी आता उच्चशिक्षित सुद्धा आहेत. आपली काळजी घ्या सुरक्षित रहा.


Most Popular News of this Week