
महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सामाजिक संस्थांचा वाढता पाठिंबा
महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सामाजिक संस्थांचा वाढता पाठिंबा
महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सामाजिक संस्थांचा वाढता पाठिंबा
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांना कल्याणातील सामाजिक संस्थांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये विश्वनाथ भोईर यांना उपेक्षित दलित सामाजिक परिषद, मेहतर रुखी वाल्मिकी विभाग, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना या संस्थांनी आपला लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्यभरात मोठ्या संख्येने असलेल्या मेहतर रुखी वाल्मिकी या उपेक्षित दलित समाज आणि सफाई कर्मचाऱ्यांना राज्यातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार न्याय - हक्क आणि प्रतिनिधित्व मिळवून देऊ शकते. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणू शकते असा विश्वास या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर करतानाच त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही या संस्थांमार्फत करण्यात आले आहे.