
आज शनि अमावस्येला घरात सुख-समृद्धीसाठी ‘हे’ उपाय करा
आज शनि अमावस्येला घरात सुख-समृद्धीसाठी ‘हे’ उपाय करा
मुंबई:- कर्मफळदाता शनिदेवाची कृपा आपल्यावर असावी, यासाठी प्रत्येक जण शनिदेवाची पूजा करतात. शनिदेवाची वक्रदृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर पडली, तर त्या व्यक्तीची साडेसाती सुरू होते, असं म्हणतात. त्यामुळे शनिच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी. आज 30 नोव्हेंबररोजी शनि अमावस्या असून आजच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते.
शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी येण्यासाठी काय उपाय करायला हवे, याबाबत या लेखात सविस्तर सांगितले आहे. आज शनि अमावस्येला शनिदेवाची उपासना केल्यास दुप्पट फळ मिळेल. शनिवारी अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून आराम मिळतो. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे. आज शनि अमावस्येचे उपाय जाणून घेऊयात-
शनि अमावस्येची तिथी-
हिंदू पंचांगनुसार, शनी अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:29 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:50 वाजता समाप्त होईल. या काळात शनिदेवाची पूजा करावी.
शनि अमावस्येचे महत्त्व-
शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी शनि अमावस्या हा शुभ दिवस मानला जातो. शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ असते. शनि अमावस्येला मोहरीच्या तेलात तीळ मिसळून शनिदेवाला अर्पण केले जाते.
शनीच्या प्रकोपापासून मुक्तीसाठी ‘हा’ उपाय करा-
शनिदेवाला मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून सूर्यास्तानंतर त्याचा अभिषेक करावा.
तसेच ‘ओम शन शनैश्चराय नमः’ या मंत्राचा उच्चार करत शनिदेवाला काळे-निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करावीत.
अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण देखील केले जाते.
अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा देखील केली जाते. तसेच तुपाचा दिवा लावून सात परिक्रमा करावी.
काळे तीळ, कपडे, ब्लँकेट, शूज आणि चप्पल दान करा.