Breaking News

मविआ मोठे यश, केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेला तयार

मविआ मोठे यश, केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेला तयार

मविआ मोठे यश, केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेला तयार

दिल्ली:- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने मविआच्या शंकांचे निरासन केले होते. तसेच सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका बदलली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे.


Most Popular News of this Week