Breaking News

राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार

राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार

राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार

मुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. राज्यात येत्या चार दिवसांत तापमानात घट होणार असून थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. भारतीय हवामान विभाग पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बहुतांश ठिकाणी पाऊसही झाला. परिणामी, काही भागात उकाडा जाणवू लागला. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या ९ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे.


Most Popular News of this Week