Breaking News

एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा

एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा

एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा

पुणे :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संकष्टी चतुर्थीच्यानिमित्त १७ जानेवारीला पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे.त्यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही विशेष बस १७ जानेवारीला सकाळी ७ वाजता सुटणार असून प्रौढांसाठी ९९० रुपये ते १००५ रुपये तर मुलांसाठी ५०० ते ५०५ रुपये असे तिकीट दर असणार आहेत. अष्टविनायक दर्शनाचा प्रवास मोरगाव येथील मयुरेश्वर येथून सुरू होणार आहे. त्यानंतर सिद्धटेक,पाली,महाड, थेऊर,लेण्याद्री,ओझर आणि रांजणगाव अशी यात्रा होणार आहे.ओझरमध्ये भक्ती निवासामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय असणार आहे.मात्र त्याचे पैसे भाविकांना द्यावे लागणार आहे.ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बस डेपोमधूनही उपलब्ध असणार आहे. अष्टविनायक यात्रेसाठी www msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन बुकिंग करता येईल.


Most Popular News of this Week