Breaking News

क्षेत्रस्तरित निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

क्षेत्रस्तरित निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

क्षेत्रस्तरित निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनानुसार संत निरंकारी सत्संग भवन, कळवा, ठाणे येथे रविवारी आयोजित ‘निरंकारी बाल समागम’ मोठ्या हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समागमामध्ये ठाणे ते दिवा परिसरातील निरंकारी सत्संगामधील बालकांनी व त्यांच्या पालकांनी मिळून सुमारे दोन हजार भाविकांनी भाग घेतला.


या बाल संत समागमात मुख्य मंचावरुन आपले विचार व्यक्त करताना आगरा येथून आलेले निरंकारी प्रचारक शिखर महेन्द्रु म्हणाले, की सत्संगमध्ये आपल्याला मनाचे भोजन प्राप्त होते. मनामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता यांसारख्या दिव्य गुणांचा विकास होतो. निरंकारी बाल सत्संगमध्ये मुलांना जी सकारात्मक ऊर्जा व शिकवण प्राप्त होते त्यातून ती मुलं जीवनातील चढ-उतारांमुळे विचलीत होत नाहीत. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचे मनोबल त्यांना प्राप्त होते. 

 या अगोदर विविध शाखांमधून आलेल्या बाल सत्संगातील मुलांनी सम्पूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे गायन, हिंदी, मराठी, इंग्रजी व भोजपुरी भाषांमध्ये में भक्तिगीतं तसेच अनेक भाषांतून कविता सादर केल्या. या शिवाय मिशनच्या शिकवणूकीवर आधारित नृत्यगीते आणि लघुनाटिकाही प्रस्तुत केल्या ज्याचे श्रोत्यांनी तोडभरुन कौतुक केले.

या समागमामध्ये बाल प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते ज्याचा विषय होता- ‘विस्तार – असीम की ओर’. या बाल प्रदर्शनीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित अनेक मॉडेल्स मुलांकडून मांडण्यात आले होते आणि या मॉडेल्समधून जी शिकवण घ्यायची आहे तीही प्रदर्शनीच्या प्रेक्षकांना मोठ्या तन्मयतेने मुलांकडूनच समजावली जात होती. या बाल समागमात विविध शाखांतील मुलांनी मुख्य अतिथींचे स्वागत केले.

 कार्यक्रमामध्ये सेक्टर संयोजक डॉ. आर.एस.यादव व सुभाष भोसले यांच्यासह अनेक शाखांचे मुखी व सेवादल अधिकारी आणि बाल सत्संग इंचार्ज उपस्थित राहून बालकांना मार्गदर्शन करत होते. या व्यतिरिक्त मुंबई, वडाळा, वाशी व भाईंदर येथेही याच दिवशी क्षेत्रस्तरिय बाल संत समागमांचे आयोजन करण्यात आले होते.


Most Popular News of this Week