
पोलिसांची विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती
पोलिसांची विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती
कल्याण : पोलीस रेझिंग डे निमित्ताने कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दिमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल, कोळसेवाडी मार्केट कल्याण पूर्व येथे सायबर जनजागृती तसेच महिला सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली. यावेळी सायबर जनजागृती विषयक मार्गदर्शन केले. गुड टच, ब्याड टच तसेच सोशल मीडियाचा वापर आणि विना परवाना ड्रायव्हिंग याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे 70 ते 75 विद्यार्थी व 4 शिक्षक उपस्थित असल्याची माहिती कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.