
पोलीस व पत्रकारांना मिठाई भेट देऊन नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
पोलीस व पत्रकारांना मिठाई भेट देऊन नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
पोलीस व पत्रकारांना मिठाई भेट देऊन नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
कल्याण : कल्याण शिव-भीम मिठाई मावा खवा ट्रांस्पोर्ट चालक मालक व्यापारी कामगार संघटना तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदाही मिठाई भेट देण्यात आली. कर्तव्यनिष्ठ खाकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस दलाला सलाम करत २ जानेवारी पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत हार्दिक शुभेच्छा दिल्या व ६ जानेवारी रोजी देशाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शूभेच्छा देण्यात आल्या.
कल्याण उल्हासनगर डोंबिवली भिवंडी पालघर येथील अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस स्टेशन व पत्रकार बंधू यांना मिठाई देउन मावा खवा व्यापारी, वाहतूकदार, विक्रेते, कामगार यांना कायदेशीर केलेल्या सहकर्या बद्दल आभार व्यक्त केले असल्याचे संघटना सचिव जयदीप सानप यांनी सांगितले.
मिठाई वाटप करताना संस्थापक संघटना तथा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, संघटना अध्यक्ष सागर पगारे, सदस्य राजा जाधव, विनोद शिंपी, पवन पाटिल, असलम खान, रामदुलारे सिंघ, पुरुषोत्तम खंडेलवाल, सेवाराम बघेल, सुनील आग्रारी, दाताराम राजपुत, रॉकी राजपुत, केशव सिंह, संजय यादव, लालसिंह, विजय फझल, आसिफ, नफीस, अभू सय्यद, राज यादव उपस्थित असल्याची माहीती संघटना सचिव जयदीप सानप यांनी दिली.