Breaking News

इंटरपोल प्रमाणे ‘भारतपोल’ सुरू

इंटरपोल प्रमाणे ‘भारतपोल’ सुरू

इंटरपोल प्रमाणे ‘भारतपोल’ सुरू

नवी दिल्ली : देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजमितीस इंटरपोलची मदत घेतली जात होती. आता इंटरपोलच्या धर्तीवर भारत सरकारने 'भारतपोल' स्थापन केले आहे. इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' सुरू करण्यात आल्याने आता पोलिसांचा थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या ‘भारतपोल पोर्टल’चे उद‌्घाटन केले. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हे, मानवी तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हे आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे.

भारतपोल पोर्टलद्वारे वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस गुन्हेगारांची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे. असे असले तरी राज्यांचे पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार आहेत.


Most Popular News of this Week