Breaking News

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार - निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार - निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार - निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

कल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न झाला. भक्तीपर्वाच्या निमित्ताने ठाणे शहर आणि कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापुर परिसरामध्ये एकंदर 22 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने स्थानिक भक्तगणांनी भाग घेतला.

समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।”

समागमा दरम्यान अनेक वक्ते, कवी व गीतकारांनी विभिन्न माध्यमातून गुरुचा महिमा आणि भक्तीभावनेचे सारगर्भित वर्ण केले आणि संतांच्या प्रेरणादायी शिकवणूकीतून भाविकांच्या जीवनातील आध्यात्मिक दृष्टीकोन समृद्ध केला.

सतगुरु माताजींनी माता सविंदरजी आणि निरंकारी राजमाताजी यांचे जीवन भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगून या दिव्य विभूतींचे जीवन हे भक्ती आणि सेवा यांचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगितले. निरंकारी मिशनचा मूळ सिद्धांत हाच आहे, की भक्ती ही परमात्म तत्वाला जाणूनच सार्थक रूप घेऊ शकते. निःसंदेह सतगुरु माताजींच्या अमूल्य प्रवचनांनी भाविक भक्तगणांना जीवनात ब्रह्मज्ञानाद्वारे भक्तीचे वास्तविक महत्व समजण्याची आणि अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली. 




Most Popular News of this Week