
आरोपी आला ताब्यात
आरोपी आला ताब्यात
मुंबई : बॉलीवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे.