
प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग
प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग
प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे