Breaking News

भावना व्यक्त करायला शिका – प्रसाद कुलकर्णी

भावना व्यक्त करायला शिका – प्रसाद कुलकर्णी

भावना व्यक्त करायला शिका – प्रसाद कुलकर्णी

कल्याण : भावना व्यक्त करायला शिका जी माणस कधी व्यक्त होत नाही त्यांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच माणसाचा माणसाशी संवाद तुटत चालला आहे म्हणून समाजामध्ये आत्महत्येच प्रमाण वाढलं आहे कारण माणूस एकटा पडत चलला आहे असे मत सादरकर्ते एकपात्री कलाकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु.भा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्ताने ‘आनंद यात्रा’ कार्यक्रम प्रसंगी मनामनावर आनंदाची अत्तरदाणी शिंपडणारा, धमाल एकपात्री कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, आयुष्य खूप सुंदर, अनमोल गिफ्ट आहे ते जगायला शिका नाही तर शेवटच्या क्षणी आख्या आयुष्याचा पट समोर दिसेल आपण जगण्यासाठी आलो होतो पण आपण जगलोच नाही ही खंत राहिल. तुम्ही जे पेरता तेच उगवते प्रवाह चालू आहे. या प्रवाहात माणसं चांगली किंवा वाईट भेटतील हे आपल्या हातात नाही पण माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोण महत्वाचा आहे. त्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. बोलावसं वाटलं तेव्हा बोला, रडावस वाटलं तेव्हा रडा कारण तो आपल्या मोकळे होण्याचा मार्ग आहे.

कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक, ज्येष्ठ कवी राजीव जोशी, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस नीलिमा नरेगलकर, कार्यकारीणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, ग्रंथसेविका वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 



Most Popular News of this Week