धाडसी पोलिस उप निरीक्षक हृदयनाथ कदम- ताडदेव पोलिस ठाणे
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम
दिनांक : २८/०९/२६ रात्री . १०.३० च्या सुमारास कर्तव्यावरून महालक्ष्मी रेसकोर्स इथून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असता तीन इसम मेट्रो रेल्वेचे काम चालू असलेल्या ठिकाणी लोखंडी चेंबर चोरी करून उचलून दुचाकीवर ठेवत असता पोलिस उप निरीक्षक कदम ह्यांनी त्यांना पाहिले.
विचारणा केली असता त्यातील दोन चोर पळून गेले तिसरा चोर दुचाकीवरून पळत असता पोलिस उप निरीक्षक कदम ह्यांनी त्यांच्या दुचाकी वरून पाठलाग करण्यास सुरवात केली. दुचाकी वरील चोराने भरधाव दुचाकी पळवत कस्तुरबा गांधीनगर वरळी या दिशने जात वयस्कर व्यक्तीला धक्का देत पळत असता. पी.एस. आय. कदम ह्यांनी स्थानिकांच्या मदतीने चोरास पकडले आपल्या जीवाची कोणती पर्वा न करता अत्यंत धाडसाने चोरास मुद्देमालासह पकडून वरळी पोलिसांच्या स्वाधीन केल.
त्यांनी दाखवून दिलं मुंबई पोलिस कर्तव्यावरून घरी जात असताना सुद्धा किती सतर्क आहेत. ह्याच एक उत्तम उदाहरण पी. एस. आय. हृदयनाथ कदम ह्यांनी दिलं सलाम अशा पोलीस जवानांना त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई पोलिस कमिशनर माननीय. श्री. देवेन भारती ह्यांनी त्यांना सन्मानित करावे जेणे करून भविष्यात अशा पोलीस जवानांचे मनोबल उंचावेल...
Most Popular News of this Week
धाडसी पोलिस उप निरीक्षक...
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...
वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...
