गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई
पोलीस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ–२, मुंबई
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई
बनावट मोबाईल विक्री करून अॅमेझॉन कंपनी व ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई ०४ मोबाईल हस्तगत, ०२ आरोपी अटक”
फिर्यादी यांच्या पेडर रोड, मुंबई येथील दुकानातून अॅमेझॉन ई-कॉमर्सच्या भिवंडी येथील वेअरहाऊसमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आलेल्या १० ओरिजनल मोबाईल फोनऐवजी बनावट मोबाईल ग्राहकांना वितरित करण्यात आले. यामुळे फिर्यादींची ₹९,४७,७७६/- इतकी आर्थिक फसवणूक झाली म्हणून गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र.–०३/२०२६, कलम ३१६(५), ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान फसवणूक झालेल्या एकूण १० मोबाईल फोनपैकी ०४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, उर्वरित ०६ मोबाईल फोन सध्या कोणाच्या वापरात आहेत याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यात आली आहे तसेच मोबाईल फोनची विक्री करणाऱ्या आरोपींपैकी ०२ आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास चालू आहे.
गुन्ह्यातील आरोपी हे अॅमेझॉनवर मोबाईल फोन ऑर्डर करून मोबाईल फोन काहीतरी बहाण्याने रिटर्न करताना दुसरेच स्वस्त कमी दर्जाचे फोन परत करून मूळ मोबाईलची संपूर्ण रक्कम परत मिळवित होते. त्यामुळे विक्रेत्यांना मोबाईल तसेच त्याची विक्री रक्कम, दोन्हींचे नुकसान होत होते.
-:अटक आरोपींचा तपशील :-
१) मिलन घनश्यामभाई देवमुरारी, वय–३३ वर्षे,
२) प्रवीणकुमार रूपचंद तांती, वय–२८ वर्षे,
सदरची उत्कृष्ट कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ–२, मुंबई श्रीमती रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त, गावदेवी विभाग, श्रीमती सुमन चव्हाण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गावदेवी पोलीस ठाणे प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई, पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग खंडाडे, पो.ह. १६०६५३/राजन परब, पो.ह. ०४०४५३/शैलेश कदम, पो.ह. ०५०३०८/अभिजित जाधव, पोशि १११८४१/विनोद शिंदे, पोशि ११०१६५/दिपक करंबळकर, पोशि १४२५६७/अभिजित कर्चे व पो.शि.क्र. १५१५६२/जगदेव यांनी केली आहे.
Most Popular News of this Week
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबतगु.र. क्रमांक 29 /2022, कलम...
मरीन ड्राईव्ह पोलीस - मुंबई
मागील 07 वर्षा पासून फरार जाहीरनामा प्राप्त आरोपी पकडले बाबत पोलीस...
