अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई

       अंमली पदार्थ विरोधी कक्ष,

            गुन्हे शाखा, बृहन्मुंबई                                         

मुंबई उपनगरात हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या ०१ आरोपीस अटक करून १ कोटी ३८ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त.

गु.र.क्र. व कलम :-

गु.र.क्र. ८८/२०२६ (कस्तुरबामार्ग पो.ठाणे, गु.र.क्र. ६६५/२०२६), कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५.

                -: दाखल दिनांक :-

दिनांक २९/०९/२०२६ रोजी १५:५८ वा.

            -: गुन्हयाचे घटनास्थळ :-

खोदीयार नगर, बोरीवली (पू.), मुंबई.

                -: आरोपीची संख्या :-

    आरोपी : ०१

     -: जप्त मुद्देमाल व अंदाजे किंमत :-

एकुण ६९१ ग्रॅम वजनाचा हेरॉईन, अं.कि.रु. १,३८,२०,०००/- व एक सॅकबॅग.

   मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई सो. यांचे आदेशान्वये मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थांची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई यांचेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

     दिनांक २९/०९/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटने गस्ती दरम्यान खोदीयार नगर, बोरीवली (पू.), मुंबई येथे एका संशयीत इसमास ताब्यात घेवून मुंबई परिसरात अवैधपणे विक्री करीता आणलेला खालील प्रमाणे नमुद अंमली पदार्थ जप्त करून एकुण ०१ आरोपीस अटक करून खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.

आरोपीच्या सॅकबॅग मधून एकूण ६९१ ग्रॅम वजनाचा हेरॉईन, अं.कि.रु. १,३८,२०,०००/-

एकुण हस्तगत ६९१ ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ, अं.कि.रु. १,३८,२०,०००/-

  अशा प्रकारे ०१ अटक आरोपीकडे एकुण ६९१ ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ, एकुण किं. रु. १,३८,२०,०००/- मिळून आल्याने त्याचे विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून अं.प.वि. कक्ष कांदिवली युनिट गु.र.क्र. ८८/२०२६, कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस सदर गुन्हयात दिनांक २९/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

     सदरची यशस्वी कामगिरी ही मा.श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा.श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मा.श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्रीमती पूर्णिमा चौगले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व मा. श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिट येथील प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. राहुल लोखंडे, पो.उ.नि. निखिल शेळके व पथक यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

धाडसी पोलिस उप निरीक्षक...

     ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...

वरळी पोलिस स्टेशन - मुंबई

   वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

       अंमली पदार्थ विरोधी कक्ष,            गुन्हे शाखा,...