गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई
मुंबई पोलीस उपायुक्त दक्षिण परिमंडळ ०२, मुंबई
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई
" फिर्यादी यांचे दुकानातून ०३ सॅमसंगचे कंपनीचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीकडून चोरीच्या मुद्देमालासह एकूण ७,२००००/- रुपये किमतीचे ४२ मोबाईल हस्तगत करून ७ गुन्हे उघडकीस आणण्याबाबत"
फिर्यादी नामे श्री विलास जेठालाल छेडा, वय वर्षे ५६, यांचे भुलाबाई देसाई रोड, मुंबई २६ येथून दुकानांमधून दिनांक १०/०६/२०२६ साधारण १०.३० ते १०.५० च्या सुमारास अज्ञात चोरट्या इसमाने फिर्यादी यांचे वापरात असलेले जुने ०३ मोबाईल चोरी केले. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाणे येथे गु. र. क्रं. ५२७/२०२६ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हाच्या तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेतील पाहिजे आरोपीस ओळख पटवून अटक करण्यात आली.
सदर आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता त्याने चौकशीत आपले नाव मोहम्मद अली सय्यद असे सांगितले आणि त्याचा गुन्ह्यातील असलेला सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तपासा दरम्यान आरोपी मोहम्मद अली सय्यद चोरीची मालमत्ता स्वीकारणारे यांची नावे सांगितली
१) दानिश नयुम कुरेशी वय ३१ वर्षे
२) अमीर रईस कुरेशी वय २८ वर्षे
३) कासिम मसूद खान वय २८ वर्षे
४) झाकीर खान वय २८ वर्षे
यांच्याकडून चोरीच्या ०३ मोबाईल सह ,४२ मोबाईल अंदाजे किंमत ७,२००००/- रुपये इतकी असून आतापर्यंत ०७ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सह. आयुक्त श्री. मनोज कुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त श्रीमती. रागसुधा आर (दक्षिण परिमंडळ ०२),
सहाय्यक पोलीस आयुक्त : सुमन चव्हाण (गावदेवी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक : श्री. संजय लोंढे, पोलीस निरीक्षक : श्री. राजीव पाटील (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक : श्री. प्रताप देसाई, पोलीस उप निरीक्षक : श्री. अनिकेत शेडगे, पोलीस उप निरीक्षक : श्री. रणजीत चव्हाण, पोलीस हवालदार : राजन परब, पोलीस हवालदार : नरेंद्र कांबळे, पोलीस हवालदार: रुपेश परब, पोलीस हवालदार : शैलेश कदम, पोलीस हवालदार : अभिजीत जाधव, पोलीस शिपाई: दीपक करंबळकर, पोलीस शिपाई : पुंजाराम गाडेकर, पोलीस शिपाई : तन्मय सावंत, पोलीस शिपाई : जगदेव(तांत्रिक मदत), यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यास गतिमान कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
