Breaking News

वरळी डिव्हिजनचे वाहतूक पोलीस हवालदार

वरळी डिव्हिजनचे वाहतूक पोलीस हवालदार

    वरळी  डिव्हिजनचे वाहतूक पोलीस हवालदार सुहास नानासाहेब बेळीकट्टे ( पो.ना.क्रं ०४१११५ वाहतूक ) कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस हवालदार कर्तव्यावर असताना दिनांक : ६/४/२६ सायंकाळी वरळी 52 चाळ महिंद्रा या ठिकाणी रस्त्यावर ऑइल पडले असता त्यांच्या लक्षात आले त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ताबडतोब तिथे मातीची व्यवस्था करून पडलेल्या ऑइलवर माती टाकण्यात आली.       

    संध्याकाळच्या वेळेस ह्या ठिकाणी ऑफिस सुटल्या नंतर खूप गर्दी असते तसेच ह्या ठिकाणी दुचाकीस्वार यांची ही गर्दी असते अशा वेळेस दुचाकीस्वार ऑईल वरून घसरून पडण्याची शक्यता जास्त असते वाहतूक पोलीस हवालदार सुहास बेळीकट्टे ह्यांनी वेळीच सावध होऊन होणारा  पुढील अनर्थ टाळला. 

      तसेच श्री. सुहास बेळीकट्टे ह्यांचे एक वैशिष्ट अस आहे ते कर्तव्यावर असताना. त्यांच्या ड्युटीत कोणी सिग्नल जंप करो, कोणी विना हेलमेट असो, बीना परवाना कोणी गाडी चालवत असेल समोरची व्यक्ती कोणी असो अशांना ते कायद्याने त्या व्यक्तीस दंड आकारतात मग ती व्यक्ती कोणी असो. कोणी कितीही कोणती ओळख सांगू दंड आकारल्याशिवाय समोरच्या व्यक्ती सोडत नाहीत. आपले कर्तव्य चोख पार पाडतात त्याच बरोबर कायदेशीर दंड आकारून  शासनाच्या तिजोरीस सुद्धा हातभार लावतात खरोखर अशा कर्तव्यदक्ष पोलीस जवानांची पोलिस खात्यास गरज आहे. कोणी किती काही बोलो ते आपली ड्युटी करत असतात. यांच्या  या कार्याला कडक सॅल्युट.....


Most Popular News of this Week

वरळी डिव्हिजनचे वाहतूक पोलीस...

    वरळी  डिव्हिजनचे वाहतूक पोलीस हवालदार सुहास नानासाहेब...