अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६ तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६ तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या सहा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला फिर्यादी श्री. श्रवण लक्ष्मण रावल वय. ४५ वर्षे राहणार विरार पालघरं हे अँटॉप हिल इथून रस्त्यावरून जात असता ४ अनोळखी इसमांनी त्यांना चारचाकी गाडीत जबरदस्तीने  बसून धमकी देऊन त्यांच्या कडून ३२,५०,००० रोख रक्कम काढून त्यांना घाटकोपर इथे सोडून देण्यात आले.

 फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार अँटॉप हिल पोलिसांनी सदर तपास सुरू केला सदर गुन्ह्याचे कोणते ही धागेदोरे नसताना तक्रारदार व आरोपी एकाच कंपनीत काम करत होते तपासा अंती असे कळले मागील १ वर्षा मध्ये नोकरी सोडून गेलेल्या ८ लोकांची माहितीची तांत्रिक विश्लेषण  करून सदर इसमास गुप्त बातमीदार द्वारे चेंबूर परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशीच्या अनुषंगाने विचापूस केली असता त्यांने व त्याच्या ०७ साथीदारांनी नमूद गुन्हा कबूल केला.

     नमूद गुन्ह्यातील आरोपी आता पर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली त्यांनी नावे १) राहुल एकनाथ गायकवाड वय ३० वर्षे  २) इरफान अली अहमद अली खान वय ३३ वर्ष ३) विवेक विलास काकडे वय ३२ ४) संतोष वसंत मलेकर वय ४४ वर्ष ५) स्वप्निल चंद्रकांत पाटील वय ३४ वर्ष व ६) मोहम्मद रिजवान अन्सार वय ४१ वर्ष त्यापैकी ०२ आरोपी हे नालासोपारा, ०३ आरोपी हे गोवा राज्य, ०१ आरोपी नेहरूनगर कुर्ला, अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम २९, ६९००० /- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली.

     सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सहआयुक्त श्री सत्यनारायण चौधरी(कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त श्री विक्रम देशमाने  (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त श्रीमती राग सुधा आर (परिमंडळ ०४), सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहास कांबळे (सायन विभाग),  यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. शिवाजी पावडे पो.नि. गोपाळ भोसले (गुन्हे), पो. नि. समीर कांबळे स.पो. नि. सतीश कांबळे स. पो. नि. शिवाजी मदने स.पो. नि. प्रदीप पाटील पो. उप. नि. संदीप सोनवलकर, पोलीस हवालदार, रस्ते, टेळे, ठोके, पोलीस शिपाई, ठाकूर, पाटील, आमदे,  बाबर, माने, विसपुते, माने, कीरतकर, सजगणे यांनी पार पाडली.


Most Popular News of this Week

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६...

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या सहा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला फिर्यादी...