खुनाचा गुन्हा उघडकीस, ट्रॉम्बे पोलिस- मुंबई
दिनांक : १/०७/२०२६ रोजी २३.४५ वा. च्या सुमारास एक महिला फिर्यादी तक्रारी साठी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल झाली. महिला फिर्यादी वय वर्ष ३१, धंदा- मजुरी रा. ठि. ट्रॉम्बे, यांच्या पतीवर अटक आरोपी ०१ पुरुष -४१ व अटक आरोपी ०२ पुरुष - ४० या दोघांनी सार्वजनिक रस्त्यावर, रिचमेन फुटवेअर शॉप समोर, चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई मंदिरातील आर्थिक व्यवहारावरून फिर्यादी यांचे पती शरतकुमार यांना दोन्ही आरोपी यांनी संगणमत करून रस्त्यावरचा फ्लेवर ब्लॉक डोक्यात घालून त्यांचा खून करण्यात आला व आरोपी तिथून फरार झाले.
महिला आरोपीच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस पथकाने तांत्रिक यंत्रणेचा वापर करून दोन्ही आरोपींना दिनांक : ४/०७/२०२६ रोजी जेरबंद केले. अटक आरोपी यांच्यावर गु.र.क्र. २९३/२६, कलम १०३,३ (५) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रॉम्बे पोलीस व गुन्हे शाखा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
