गोवंडी पोलीस ठाणे, मुंबई
गोवंडी पोलीस ठाणे - खुनाचा प्रयत्न
दिनांक: ६/०७/२०२६ रोजी १८.३० च्या सुमारास फिर्यादी इस्माईल खलील शेख वय, ३८ वर्ष, धंदा -टेलर राहणार ठिकाण, गोवंडी, मुंबई यांचा मुलगा हाफिज शेख हा त्याचा मित्र आयन व विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांच्यासोबत टेलिकॉम कंपनी पाटील वाडी गोवंडी,या ठिकाणी असलेल्या ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले असता विधीसंघर्षग्रस्त बालकाला हाफिज शेख याला पोहता येत नसल्याचे माहित होते.
जुन्या भांडणाचा मनात राग धरून जीव घेण्याच्या उद्देशाने तेथील पाणी भरलेल्या ओढ्यात पाठीमागून लाथ मारून ढकलून दिले.
त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा हाफिज याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७/०७/२०२६ गु. र. क्र. ५११/२६, कलम १०३, बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
