२४ तासात चोरीचा पर्दाफाश खार पोलिसांची कारवाई....
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतास २४ तासाच्या आत अटक करून १००% मालमत्ता हस्तगत केलेबाबत..
पोलीस ठाणे- खार पोलीस ठाणे, मुंबई.
गु.र क्र व कलम : 1578/2026 कलम -303(2) भा. न्या स.
गुन्हा घडला तारीख वेळ :19/09/2026 चे 18.30 ते 19:00 वाजण्याचे दरम्यान
फिर्यादी - मानसी महेंद्र चिले, वय 43 वर्षे, धंदा-गृहिणी, रा. विरार पूर्व, पालघर,
घटनास्थळ- वारीन पाडा खार दांडा खार पश्चिम
आरोपी नाव व पत्ता - शैलेंद्रकुमार दीनानाथ कश्यप वय 33 रा. ठी. खार दांडा, खार पश्चिम,मुंबई 52
हकीकत -19/09/2026 रोजी गणपती विसर्जनासाठी खारदांडा जेट्टी येथे नातेवाईकांसह गेले असता, विसर्जनासाठी जाताना त्यांची बॅग रिक्षामध्ये ठेवण्यात आली होती. विसर्जन करून रिक्षाजवळ परत आल्यानंतर सदर बॅग मिळून आली नाही. आजूबाजूस तसेच रिक्षाचालकाकडे विचारणा करून शोध घेतला असता बॅग मिळून आली नाही. सदर बॅगेमध्ये सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे 39 ग्रॅम किंमत ₹3,60,000/-, रोख ₹2,500/- व किंमतीचे कपडे ₹4,000/-, असा एकूण ₹3,66,500/- किंमतीचा ऐवज होता. अज्ञात इसमाने लबाडीच्या उद्देशाने सदर बॅग चोरी केली.
तपास: नमुद गुन्हयाच्या अनुशंगाने घटनास्थळावरील टेक्निकल पुरावे व गुप्त बातमीदाराच्या आधारे गुप्त बातमीदाराच्या आधारे गुन्हयातील पाहिजे आरोपीताचा शोध घेण्यात आला व त्यास पोलीस ठाणेस आणुन त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीताकडुन चोरी केलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आले.
हस्तगत मालमत्ता : नमूद गुन्ह्यातील 100% मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे
-: मार्गदर्शन :-
१) मा. संतोष काटे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - खार पोलीस स्टेशन
२) मा. प्रकाश मोरे सर पोलिस निरीक्षक (गुन्हे) - खार पोलीस ठाणे
दाखल अधिकारी : - पो.उ नि.शिरसाठ
तपासी अधिकारी :- पो.उप नि चौधरी
-: गुन्हे प्रकटीकरण पथक:-
सहा. पो. नि. कुंभारे
पो.उप.नि चौधरी,
पो.ह.क्र. 010568/कांबळे,
पो.ह.क्र. 040530/निकम,
पो. शि.क्र. 093762/ सावंत
पो. शि. क्र 093216/ लहामागे
पो.शि.क्र. 113159/कांबळे,
पो.शि.क्र. 113170/कदम,
पो.शि.क्र. 141186/खेडकर,
पो.शि.क्र. 150652/चव्हाण
खार पोलीस ठाणे, मुंबई
