माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे - मुंबई.
मागील 06 वर्षापासून फरार (DF) असलेल्या आरोपीस फेर अटक केले बाबत
पोलीस ठाणे:- माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे मुंबई.
गुन्हा. नो क्र.: 14/2018
कलम 51,63 कॉपी राइट act
फरार आरोपी नाव पत्ता
तबरेज आलम सय्यद,वय - 29 वर्ष, धंदा - नोकरी ,पत्ता गाव- सुरत ईस्टेट चाळ, रुम नंबर 27, मस्जिद बंदर, मुंबई
--- थोडक्यात हकिकत ---
दाखल गुन्ह्यातील आरोपी हा मागील 06 वर्ष पासून फरार असल्याने त्याच्या विरोधात मा 16 न्यायालय बेलाड पियर कोर्ट यांनी स्थायी अजामीनपात्र वारंट जारी केले होते. सदर वॉरंट बजावणी कामी तडीपार पथकाचे स. पो. नि.सचिन शेळके, व पथक यांना आदेशित केले होते.
आज दिनांक 20/08/2026 रोजी तडीपार पथकाचे स. पो. नि. सचिन शेळके व पथक यांनी वर नमूद फरार आरोपी हा क्रॉफर्ड मार्केट येथे येणार असल्याबाबतची गुप्त माहिती काढुन सदर माहितीच्या अनुषंगाने क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाळत ठेवली असता नमूद फरारी आरोपी हा क्रॉफर्ड मार्केट येथे आला असता त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. नमूद आरोपीस त्याच्या नावाचे स्थायी-अजामीन पात्र वॉरेट दाखवून तो तोच असल्याची खात्री करून त्याच पोलीस ठाणेस आणले. व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करून त्यास अटक करण्यात आली व अटक आरोपीतास मा. 16 वे न्यायालय बेलाड पियर मुंबई यांच्या समक्ष हजर करण्यात आले
---- कारवाई पथक ----
तडीपार अधिकारी
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शेळके
पो.ह.क्र.010248 गणेश शिवगण
पो. ह. क्र- 03214 शरद कांगणे
म.पो.शि. क्र. 092330 शोभना देठे
पो. शि. क्र.093387 विनायक वाघमोडे
Most Popular News of this Week
पश्चिम परिमंडळ-२
पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल...
खार पोलीस ठाणे, मुंबई
खार पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघडकीस; मयताचा पुतण्या आरोपी...
कफ परेड पोलीस, ठाणे
कफ परेड पोलीस स्टेशन हद्दीतील आर्मी कॅम्पस येथील घरातून १६ तोळे ६...
माता रमाबाई आंबेडकर मार्ग...
मागील 06 वर्षापासून फरार (DF) असलेल्या आरोपीस फेर अटक केले बाबतपोलीस ठाणे:-...
