अमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट

अमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट

      अमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट मुंबई यांनी एन डी पी एस कायदा १९८५  दाखल गुन्ह्यात अमली पदार्थाची  तस्करी करणारा सराईत गुन्हेगार इकबाल मोहम्मद अली शेख वय, ३६, राहणार ठिकाण. भगतसिंग नगर, झोपडपट्टी कुंभारवाडा, सुभाष नगर टाटा पॉवर जवळ, ९० फूट रोड, धारावी मुंबई याच्यावर अमली पदार्थाची तस्करीचे एन.डी.पी.एस कायद्यान्वये ८ गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. तसेच आरोपी इकबाल मोहम्मद अली शेख हा जामिनावर सोडून आल्यानंतरही अमली पदार्थाची तस्करी करत होता.  असे निदर्शनास आले. तसेच नमूद गुन्ह्यात मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच्याविरुद्ध मा पोलीस आयुक्त मुंबई यांचे वतीने अमली औषधी द्रव्य व मनःप्रभावी पदार्थ विधी निषेध व्यापार प्रतिबंध अधिनियम १९८८ ( PIT NDPS ACT 1988) अन्वये अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिट गुन्हे शाखा,  मुंबई  यांनी पार पाडली तसेच सदरचा गुन्हेगार इकबाल अली मोहम्मद शेख यास १ वर्ष  स्थानबद्ध करिता येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आले आहे

 सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती,  मा. अनिल कुंभारे ,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई,  माननीय. श्री कृष्णकांत उपाध्याय आपण पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली माननीय श्री नवनाथ ढवळे पोलीस उप आयुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा, मुंबई  व माननीय श्री सुधीर हिरडेकर सहाय्यक पोलीस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबई, अं. प. वि. गुन्हे शाखा,

       वरळी युनिटचे  : वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे,  यांचे नेतृत्वखाली पोलीस उप निरीक्षक अमित घोगरे, तसेच गुन्हे प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा अडसुळे, पोलीस निरीक्षक सरिता गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सतीश निंबाळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.


Most Popular News of this Week

भायखळा गुन्हे शाखेची कारवाई

    भायखळा गुन्हे शाखेने फिर्यादी समीर मोहम्मद आसिफ खान वय 41 वर्ष यांचे वर...

अमली पदार्थ विरोधी पथक वरळी...

      अमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट मुंबई यांनी एन डी पी एस कायदा...