बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम ब्रँच कक्ष - ७ ची कारवाई....
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर यांच्यावर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई.
बृहन्मुंबई मधील भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली व दहिसर परिसरातील बोगस डॉक्टर त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवी संपादित न करता त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांवर गुप्तरोगासंदर्भातील विविध आजारांवर अॅलोपॅथी व आयुर्वेदिक, युनानी औषधोपचार करून त्यांचे आरोग्य धोक्यात टाकून त्यांच्याकडून भरमसाठ फी घेऊन सामान्य नागरिकांची फसवणूक करतात अशी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ कार्यालयास विश्वासनीय माहिती प्राप्त झाली.
प्राप्त माहितीच्या अनुषंगाने कक्ष ७ कार्यालयातील पोलीस पथक यांनी वेगवेगळ्या दिवशी वैद्यकीय अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांचेसह मुंबईतील १) ‘संतोष हेल्थ क्लिनिक’ भांडुप, २) ‘विनायक हेल्थ क्लिनीक’ भांडुप, ३) ‘हमदम दवाखाना’ जोगेश्वरी, ४) ‘कोहिनूर दवाखाना’ जोगेश्वरी, ५) ‘अंकुश आयुर्वेदिक दवाखाना’ बोरीवली, ६) दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनीक, दहिसर ७) ‘समर आयुर्वेदिक दवाखाना’ मानखुर्द (सदरची कारवाई गुन्हे शाखा कक्ष ६ मार्फत) या ७ क्लिनिकमध्ये छापा टाकून, तेथे प्रॅक्टिस करीत असलेले १० बोगस डॉक्टर त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील वैद्य पदवी नसताना किंवा महाराष्ट्र मेडिकल मध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीर रीत्या गुप्तरोगां सारख्या विविध आजारावरील रुग्णांवर अॅलोपॅथी व आयुर्वेदिक, युनानी औषधोपचार करताना मिळून आले. तसेच काही क्लिनिकमध्ये बोगस डॉक्टर वैधता संपलेले युनानी व आयुर्वेदिक औषधे विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत त्यांच्या ताब्यातून साधारण रुपये २,२०,०००/- किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे औषधी बॉटल्स, सिरिंज, अँटिबायोटिक टॅबलेट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. उपरोक्त बोगस डॉक्टरांविरुद्ध भांडुप पोलीस ठाणे येथे कलम ३३, ३६ महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ७, घाटकोपर मार्फत चालू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री. नवनाथ ढवळे,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पूर्व) श्री. धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल ढोले, पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सरफरे, सपोनि. सुहास खरमाटे, सपोनि. धनाजी साठे, सपोनि. महेश शेलार, पोउपनि. अजय गोल्हार, पोउपनि. प्रमोद जंगम, पोउपनि. अरुण सावंत, पोउपनि. तानाजी उबाळे, पोउपनि. नावेकर तसेच कक्ष ७ कार्यालयाचे पोलीस अंमलदार यांचे पथकाने पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण,...
पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
