गावदेवी पोलिसांनी मोबाईल चोरीचा केला पर्दाफाश...

गावदेवी पोलिसांनी मोबाईल चोरीचा केला पर्दाफाश...

ओ            पोलीस उप आयुक्त,

       दक्षिण परिमंडळ ०२, मुंबई

      गांवदेवी पोलीस ठाणे, मुंबई

 मोबाईल चोरी करणारी टोळी अटक करून एकूण १६ लाख रुपये किमतीचे ४२मोबाईल फोन हस्तगत केल्याबाबत.


    गांवदेवी पोलीस ठाणे गु. र. क्र. ६९३/२६ कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. या गुन्हयातील फिर्यादी हे कंबाला हिल, बस स्टॉप ते पेडर रोड, मुंबई या दरम्यान बसमधून प्रवास करत असतांना अनोळखी इसमांनी गर्दीमध्ये धक्का देवून फिर्यादी यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याने उपरोक्त प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


   सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांद्वारे प्राप्त माहितीचे आधारे अधिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणारी संघटीत टोळीचा माग काढून त्यांना मानखुर्द, शिवाजीनगर आणि टोळीच्या सुत्रधारास राजस्थान येथून अटक करण्यात आलेली आहे.

        अटक आरोपींचा तपशील                             पुढीलप्रमाणे

१) अफताब आबाद अन्सारी वय २६ वर्षे

२) हसन अब्बास शेख वय ३७ वर्षे,

३) चांद मोहम्मद मोहम्मद सुलतान वय ५३ वर्षे,

४) इम्तीयाज इमामअली शेख, वय ४६ वर्षे,

५) आजम आकम कुरेशी वय ३२ वर्षे,

६) स्वप्निल शंकर सोनावणे वय २९ वर्षे

७) रजब अली मोहमद तकी शेख उर्फ चिकणा, वय ३२ वर्षे,


   अटक आरोपींकडून सदर गुन्हयातील मुद्देमालासह इतर गुन्हयातील ४२ वेगवेगळया कंपनीचे चोरी करण्यात आलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत.


   सदरची उत्कृष्ट कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), श्री. मनोजकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, (द.प्रा.वि.) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, (दक्षिण परिमंडळ ०२) श्रीमती रागसुधा आर.,

मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, (गांवदेवी विभाग), श्रीमती सुमन चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक - श्री प्रशांत मोहिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), - श्री राजीव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक - प्रताप देसाई सहाय्यक पोलीस निरीक्षक - अमित देवकर, पोलीस उपनिरीक्षक - युवराज जगताप, पोह. रूपेश परब, पोह. शैलेश कदम, पोशि. पुंजाराम गाडेकर, पोशि. तन्मय सावंत, पोशि. दिपक करमळकर, पोह. अभिजित जाधव, पोह. प्रमोद पवार, पोशि. जगदेव यांनी पार पाडली आहे.


Most Popular News of this Week

गावदेवी पोलिसांनी मोबाईल...

ओ            पोलीस उप आयुक्त,       दक्षिण परिमंडळ ०२, मुंबई     ...

पार्कसाईड पोलिस ठाणे ,मुंबई

 “मो./सायकल वरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक...

बेकायदेशीर हायड्रो गांजा...

  पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ      विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि.,...

२० वर्षांपासुन फरार असलेल्या...

२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक   सन...

बांगलादेशी नागरिकांविरुद्ध...

खार पोलीस ठाणे, मुंबई  बांगलादेशी नागरिकांविरुद्ध खार पोलिसांची कारवाई; 06...

पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण,...

    पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण,  गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...