पार्कसाईड पोलिस ठाणे ,मुंबई
“मो./सायकल वरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून एकूण- ५,७५,०००/- रु. किंमतीची मालमत्ता हस्तगत केल्याबाबत”
पार्कसाईट पोलिस ठाणे गु.र.क्र ९२५/२०२६ कलम ३०९(४),३(५) भा.न्या.सं २०२३ अन्वये मो./सायकल वरून आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीस धक्का देवून त्यांचे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरी केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीसांनी सदरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नितीन झाडे, सपोनि अतुल ठोंबरे व पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ, एल.बी.एस.मार्ग व आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पाहिजे आरोपीतांचा मागोवा काढुन सराईत आरोपी नामे १) शुभम सुखराम चौधरी वय - २७ वर्षे २) अजय उर्फ डब्लु मुन्नीलाल गुप्ता वय २८ वर्षे दोघे राहणार ठिकाण-अँटॉप हिल, मुंबई यांना अटक करून १) पार्कसाईट पोलीस ठाणे गु.र.क्र ९२५/२०२६ २) गु.र.क्र ९०८/२०२६ कलम ३०९(४),३(५) भा.न्या.सं ३) भांडूप पोलीस ठाणे गु.र.क्र ९२७/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं ४) घाटकोपर पोलीस ठाणे गु.र.क्र १०६१/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं हे ०४ गुन्हे उघडकीस आणले
तसेच आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपासकरून ०२ मोटार वाहनांसह एकुण- ५,७५,०००/- रु. किंमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. देवन भारती, पोलीस आयुक्त सो, बृहन्मुंबई, मा.श्री. मनोज कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त (का.व सु.), मा.श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, मा.श्री. अभयसिंह देशमुख, पोलीस उप-आयुक्त, पूर्व परिमंडळ-०३, मुंबई, श्रीमती प्राची कर्णे,
सहाय्यक पोलीस आयुक्त, विक्रोळी विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पार्कसाईट पोलीस ठाणे, मुंबई, श्री. अशोक लांडगे (पो.नि. गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नितीन झाडे, अतुल ठोंबरे व गुंडा विरोधी पथकाचे पोउनि अक्षय वाघ, पोउनि वाल्मिक शिंदे, सफौ/ नुरुलहसन मोमीन, पोह राहुल ढोले, पोह विशाल गवारे, पोह राहुल नवले, पोह सुनिल बोरसे, पोशि विक्रम कोल्हे, पोशि मनोज सुरवाडे, पोशि रोहिदास भुसारी, पोशि अनिल उंडे, पोशि दिपक तायडे, पोशि दिपक निकम यांनी कौशल्यपुर्ण तपास करून सदरची कामगिरी केली आहे.
Most Popular News of this Week
धाडसी पोलिस उप निरीक्षक...
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...
वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...
बेकायदेशीर हायड्रो गांजा...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि.,...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक सन...
पार्कसाईड पोलिस ठाणे ,मुंबई
“मो./सायकल वरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक...
