पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई
पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण,
गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय
बनावट APK फाईल्स द्वारे ज्येष्ठ नागरीकांना व इतर नागरीकांना फसविणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हे करणाऱ्या आरोपीतास अटक केले बाबत.
दि.१३/०८/२०२६ रोजी ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरीकास अनोळखी मोबाईल धारक याने फोन करून बँक ऑफ इंडियाचा सिनीयर मॅनेजर दिनेश कुमार असे असल्याचे भासवुन व सिनिअर सिटीजन कार्ड बनवुन देतो असे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून, फिर्यादीचे व्हाट्सॲप वर Senior Citizen Card Verification.apk नावाची APK फाईल पाठवुन त्यामध्ये फिर्यादीची वैयक्तिक व फिर्यादीचे बँकेच्या डेबीट कार्डची माहीती भरण्यास भाग पाडुन फिर्यादीची एकुण ५,६२,०००/- रू ची फसवणुक करून अपहार केल्याप्रकरणी भायखळा पोलीस ठाणेस गु.र.क्र. ४९७/२६ कलम ३१८(४), ३१९(२) भा.न्या.सं. सह कलम ६६(क) (ड) माहीती व तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा नोंद होता. नमुद गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई हे करत होते. मा. वरिष्ठांचे आदेशान्वये नमुद गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेस वर्ग होवुन गु.प्र.शा.,गु.अ.वि. गु.र.क्र. १२७/२०२६ अन्वये पुनःनोंद घेण्यात येवुन गुन्ह्याचा तपास करण्यात आला.
सदर गुन्ह्यामध्ये नमुद APK फाईल चे सखोल तांत्रिक तपास करण्यात येवुन आरोपीचा मागोवा घेण्यात आला व बनावट APK फाईल डेव्हलप करणाऱ्या एक पुरूष आरोपी वय -३६ वर्षे, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रा. राज्य मध्यप्रदेश येथुन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात अटक आरोपीचे मध्यप्रदेश येथील कार्यालयात छापा कारवाई दरम्यान आरोपीकडुन ९ पेनड्राईव्ह, १ सी.पी.यु, ३ हार्ड डिस्क, एक वाय-फाय राउटर, ३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. त्यांचे प्राथमिक तांत्रिक तपासामध्ये आरोपी हा वेगवेगळ्या सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडुन विविध कंपन्यांचे सर्व्हर वापरत असल्याचे दिसुन आले. गुन्ह्यातील अटक आरोपीने बनविलेल्या एकुण २८०५ Malicious APK फाईल्स इतर सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांना विक्री केली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
सदर २८०५ APK फाईल्स द्वारे भारतातील एकुण ९६७३ लोकांची फसवणुक केली आहे. त्यापैकी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर भारतात १०७४, महाराष्ट्रात १४३, मुंबईत ३६ तक्रारी नोंद असुन त्यांची एकुण १५,७५,००,०००/- रुपयांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी भारतात ८८, महाराष्ट्रात ०८, मुंबईत ०५ नोंद असलेले गुन्हे उघडकीस येत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), तसेच मा. श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री. राज तिलक रौशन, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. श्री. सदानंद राणे, सहायक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (विशेष), गुन्हे शाखा, मुंबई व श्री. मंगेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक, मालमत्ता कक्ष यांच्या नेतृत्वाखाली.
मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, मुंबईचे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गवळी तसेच मालमत्ता कक्षातील पोलीस अंमलदार अमित करपाते, विश्वनाथ पोळ, योगेश गाढवे, निधी नाईक, व पश्चिम सायबर पो.ठा.चे पोलीस अंमलदार मयुर थोरात यांनी सदर तपासामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
Most Popular News of this Week
पार्कसाईड पोलिस ठाणे ,मुंबई
“मो./सायकल वरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक...
बेकायदेशीर हायड्रो गांजा...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि.,...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक सन...
बांगलादेशी नागरिकांविरुद्ध...
खार पोलीस ठाणे, मुंबई बांगलादेशी नागरिकांविरुद्ध खार पोलिसांची कारवाई; 06...
पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण,...
पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
