२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक
२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक
२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक
सन २००६ मधील गुन्हयातील आरोपी नामे राजेश अर्जुन हातळकर हा मागील सुमारे २० वर्षापासुन न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहत असल्याने मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, एस्प्लेनेड कोर्ट, मुंबई यांनी त्याच्याविरूध्द अटक वॉरंट जारी केले होते.
सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी कक्ष-७ च्या पोलीस पथकाने ठाणे येथील पत्यावर शोध घेतला असता तो सदर पत्यावर अनेक वर्षापुर्वी राहत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी जामिनावर मुक्त झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्याच्या उद्देशाने त्याचे मुळ घर सोडुन इतर ठीकाणी वास्तव्य करीत होता. आरोपीताच्या सध्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध नसल्याने त्याच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती संकलीत करण्यात आली. प्राप्त गोपनीय माहितीचे विश्लेषण करून आरोपीस ताब्यात घेण्यासाठी कक्ष-७ च्या पथकाने रामचंद्र नगर, ठाणे परिसरात शोध घेतला. तसेच मानवी कौशल्य व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर आरोपी राजेश अर्जुन हातळकर यास दिनांक ०२/१०/२०२६ रोजी रामचंद्र नगर, वैती वाडी, ठाणे पश्चिम, ठाणे येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली असुन, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मा. न्यायालया समक्ष हजर करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त गुन्हे मा. श्री. अनिल कुंभारे, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. कृष्णकान्त उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री नवनाथ ढवळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) श्री धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७ चे व.पो.नि. श्री अनिल ढोले, स.पो.नि सुहास खरमाटे, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उप.नि. नामदेव परबळकर, पो.उप.नि. अरूण सावंत, स.फो २१२४७/दिपक पवार, पो.ह.क्र. ०३८३५/जाधव, पो.ह.क्र.०६१९४०/विलास राऊत, पो.ह.क्र. ०८०८७२/विकास होनमाने, म.पो.शि.क्र.१८१३१३ /सविता शिंदे यांनी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
धाडसी पोलिस उप निरीक्षक...
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...
वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...
बेकायदेशीर हायड्रो गांजा...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि.,...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या...
२० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-७ कडुन अटक सन...
पार्कसाईड पोलिस ठाणे ,मुंबई
“मो./सायकल वरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक...
