अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबई

अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबई

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                      शाखा, मुंबई
बेकायदेशीररित्या अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याबाबत.

   दिनांक १३/१०/२०२६ रोजी २३:३० वाजताच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबई पोलीस पथकाने गस्ती दरम्यान जोगेश्वरी बस डेपो, एस.व्ही. रोड, मॅक कॅफेच्या समोर, मुंबई येथे गस्त करीत असताना एका इसमास अमली पदार्थ विक्री करिता कब्जात बाळगल्याबद्दल ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली.

            अटक इसमाचा तपशील                            खालीलप्रमाणे:
  1. मोहम्मद कासिफ फारुख शेख, वय २३ वर्षे, रा. रूम नं. ११५, डी प्लॉट, मोदी कंपाउंड, घोडपदेव, माझगाव, मुंबई – ४०००१०.

   उपरोक्त नमूद इसम आरोपीकडून अंदाजे १,११,३०,०००/- रुपये किमतीचे एकूण १११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आलेले आहे.

  सदरची कारवाई मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त सो., बृहन्मुंबई, श्री. अनिल कुंभारे, मा. पोलीस सह आयुक्त सो. (गुन्हे), मा. श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त सो. (गुन्हे), मा. श्रीमती पौर्णिमा चौगुले-शृंगी, पोलीस उपआयुक्त सो., अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व मा. श्री. सुधीर हिडेकर, सहायक पोलीस आयुक्त सो., अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली
  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, मुंबईचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.


Most Popular News of this Week

क्राईम ब्रांच कक्ष - १२

बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...

बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...

अमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                     ...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...