कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबई
दिनांक - १४/१०/२०२६
मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास अटक करून एकूण ११ मोटार स्कूटर हस्तगत करण्यात कुरार पोलीस ठाणेस यश.
  कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक ०३/१०/२०२६ रोजी होंडा कंपनीची डिओ मोटार स्कूटर क्र. MH 02 DX 8340 ही शुभ्रा पार्क बिल्डींग जवळ, पठाणवाडी, कुरारगांव, मालाड (पू) मुंबई या ठिकाणावरून चोरी झाल्या बाबत फिर्याद प्राप्त झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
  सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुपबातमीदारांमार्फत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदर परीसरात त्याचेवर पाळत ठेवून नमूद गुन्ह्यातील मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या आरोपीतास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस ठाणेस आणून त्याचेकडे केलेल्या सखोल व कौशल्यापूर्ण तपासात त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास नमूद गुन्ह्यात दिनांक ०५/१०/२०२६ रोजी अटक करण्यात आले.
  नमूद गुन्ह्यातील अटक आरोपी नामे अमित दिलीप सोनी, वय १९ वर्षे याचेकडे केलेल्या तपासात, तो व त्याचा मित्र मिळून मुंबई शहर व मुंबई शहराबाहेर त्यांनी अनेक मोटार स्कूटर चोरी केल्याची तपासात दिसून आले. आरोपीत वज्रेश्वरी, तुंगारेश्वर, वसई येथे जात - येत असताना लोकांनी रस्त्यावर पार्क केलेल्या मोटार स्कूटर, ज्या मोटार स्कूटर कोणत्याही बाडीने चालू होतात अशा मोटार स्कूटर आरोपीतांच्या जवळ असलेल्या जुन्या चावीने (मास्टर की) त्या चालू करून चोरी करत होते. नमूद अटक आरोपीताने त्याच्या मित्रासह मिळून कुरार पोलीस ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील एकूण ११ मोटार स्कूटर चोरी केल्याचे सांगितले आहे. त्या निवेदन पंचनाम्यात जप्त करण्यात आल्या आहेत.

खालील मोटार स्कूटरबाबत तपास चालू आहे :-
अटक आरोपीताचे नाव व पत्ता :-
१) अमित दिलीप सोनी, वय १९ वर्षे, काम - डिलीव्हरी बॉय, रा.ठी. - महात्मा फुले चाळ, भीमनगर, कुरारगांव, मालाड पूर्व, मुंबई.
२) गुन्ह्यातील दुसरा आरोपीत विधीसंघर्षीत असून त्याचे वरती बाल अधिनियमा प्रमाणे कारवाईची तजवीज आहे.
अटक आरोपीताकडून गुन्ह्याच्या तपासात हस्तगत करण्यात आलेल्या ११ मोटार स्कूटरची माहिती खालील प्रमाणे:-
१) कुरार पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र ९७८/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस २०२३
MH02DX8340 होंडा कंपनीची DIO
२) कुरार पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र ९५१/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस २०२३
MH 47 AC 9613 होंडा कंपनीची DIO
३) कुरार पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र ५७२/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस २०२३
MH02DY4032 होंडा कंपनीची Activa
४) मेघवाडी पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र ४३१/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस २०२३
MH01EG0114 होंडा कंपनीची DIO
५) नवोघर पोलीस ठाणे, मिराभाईंदर गु.र.क्र ८८०/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस २०२३
MH48CA1578 होंडा कंपनीची Activa 6 G
६) MH47V7096 होंडा कंपनीची Activa 4 G
७) MH50K0983 होंडा कंपनीची Activa 4 G
८) MH48AH8373 होंडा कंपनीची Activa 125
९) MH01BC7931 सुझुकी कंपनीची Access 125
१०) MH05BT8797 हिरो कंपनीची Mestro
११) MH01CB7322होंडा कंपनीची DIO
  सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री. शशकुमार मिना, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रा. विभाग मुंबई, मा. श्री गजानन राजमाने, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ - १२, मुंबई, मा. कैलास बर्वे,
  सपोआ समतानगर विभाग, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाणेचे वपोनि.सुशिलकुमार गायकवाड, पोनि(गुन्हे) भारत दराडे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि ज्ञानेश्वर जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोह/तानाजी मोरे, पोह/अविनाश गुजर, पोशि/बबन राठोड, पोशि/संतोष फडतरे, पोशि/श्रीकांत गोरे अशा पोलीस पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण मुंबई शहर व मुंबई शहरा बाहेरील गुन्हे उघडकीस आणले आहे. पोलीस पथकाची कामगिरी कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.



Most Popular News of this Week

क्राईम ब्रांच कक्ष - १२

बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...

बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...

अमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                     ...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...