काळाचौकी पोलिसांनी १३ लाख ८६ हजार २०० रुपये मुद्देमाला सहित ४८ तासात उत्तर प्रदेश येथून अटक

काळाचौकी पोलिसांनी १३ लाख ८६ हजार २०० रुपये मुद्देमाला सहित ४८ तासात उत्तर प्रदेश येथून अटक

     काळाचौकी येथील प्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी खामकर मसाले यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मसाल्याच्या दुकानावर १३ लाख ८६ हजार २००  रुपये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी दुकानात आल्यावर जमा केलेली रक्कम मिळून न आल्याने त्यांनी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक १३९/२६ BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला. 

    तपास पथकाने त्यांच्या दुकानात असलेल्या कामगारांची चौकशी केल्यावर असं समजले एक कामगार सकाळपासून कामावर आला नव्हता सदर कामगारा विषयी माहिती घेतली असता सदर कामगार हा गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आयोध्या, येथे उत्तर प्रदेश वरुण ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव अजय कुमार श्यामसुंदर रावत वय - २८ वर्षे,  जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश, सदर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ रोख रक्कम १० लाख ४७ हजार ५२० मिळाले.

सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सहआयुक्त श्री सत्यनारायण चौधरी(कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त श्री विक्रम देशमाने (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त श्रीमती राग सुधा आर (परिमंडळ ०४), श्री. घनश्याम पलंगे सहाय्यक पोलीस आयुक्त भोईवाडा विभाग,  मुंबई . श्री विजयकुमार शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  काळाचौकी यांचे मार्गदर्शना खाली स.पो. नि . श्री.  हसन मुलानी, पो. उप. नि. शितल माने,  पोलीस हवालदार - अमर चन्ने, गोविंद ठोके (तांत्रिक मदत), पोलीस शिपाई - प्रशांत पवार, चंद्रकांत कुंभार, महिला पोलीस शिपाई - तेजस्विनी गवारी, या सर्व पोलीस जवानांनी आणि महिला पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली....


Most Popular News of this Week

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६...

अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या सहा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला फिर्यादी...

काळाचौकी पोलिसांनी १३ लाख ८६...

     काळाचौकी येथील प्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी खामकर मसाले यांच्या...

गुन्हे शाखेकडून दोन खुनी...

   नागपाडा पोलीस ठाणे अंतर्गत मोहम्मद इकबाल सलिया वय वर्ष ७८ या इसमाचा...