गुन्हे शाखेकडून दोन खुनी आरोपींना अटक
नागपाडा पोलीस ठाणे अंतर्गत मोहम्मद इकबाल सलिया वय वर्ष ७८ या इसमाचा त्याच्या राहत्या घरी नागपाडा येथे खून करण्यात आला. आरोपी क्रमांक ०१ वय वर्ष २९ याने चाकूने वार करून खून केला.
सदर गुन्हचा तपास गुन्हे शाखेकडून समांतर सुरू असताना गुन्ह्याचा तांत्रिक तपास तसेच मानवी तपास कौशल्य वापरून विश्वसनीय गुप्त बातमीदार तयार करून सदरच्या तपासात गुन्हा केलेला आरोपी आरोपी क्रमांक ०१ वय वर्ष २९ व आरोपी क्रमांक ०२ वय वर्ष २५ यांनी खात्रीलायक गुन्हा केला हे सिद्ध झालं.
दोन्ही आरोपी यांनी त्यांचे वापरत असलेले मोबाईल हँडसेट बंद करून मुंबई बाहेर इतरत्र जागा बदलून राहत होते तसेच पोलीस अटके पासून योग्य ती खबरदारी घेत होते गुन्हे शाखेने केलेल्या योग्य ते तांत्रिक व मानवी तपासामध्ये हे दोन्ही आरोपी नागपूर येथे वास्तव्य करीत असल्याचे खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे नागपूर येथे त्वरित पथक पाठवून बडा ताज बाग परिसर नागपूर, या ठिकाणी हे दोन्ही आरोपी मिळून आले.
आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपी क्रमांक ०१ वय वर्ष २९ हा एन्काऊंटर झालेले कृप्रसिद्ध गॅंग स्टार सादिक कालिया (१९९७), व आरिफ कालिया (२००२), यांचा पुतण्या असून त्यास संशय होता की, त्याचे काका सादिक कालिया व आरिफ कालिया, यांच्या एन्काऊंटर मध्ये मयत इकबाल सलिया हा खबरी होता. त्याचा राग मनात धरून आरोपी क्रमांक ०१ वय वर्ष २९ व आरोपी क्रमांक ०२ वय वर्ष २५ याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचं कबूल केले.
सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई, श्री. लखमी गौतम मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रोशन मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य), श्री. सदानंद राणे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, स. पो. नि. अमोल माळी, सहाय्यक फौजदार - घाटकर, पालांडे, पोलीस हवालदार - विनोद परब, रवींद्र देवार्डे, अशोक पाटील, वासुदेव परब, वैभव गिरकर, पोलीस शिपाई - विकास चव्हाण, मारुती खेडकर यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली.....
Most Popular News of this Week
अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६...
अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या सहा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला फिर्यादी...
काळाचौकी पोलिसांनी १३ लाख ८६...
काळाचौकी येथील प्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी खामकर मसाले यांच्या...
गुन्हे शाखेकडून दोन खुनी...
नागपाडा पोलीस ठाणे अंतर्गत मोहम्मद इकबाल सलिया वय वर्ष ७८ या इसमाचा...
