मुंबई गुन्हे शाखेची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई, कक्ष - ११
मुंबई गुन्हे शाखेची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई, कक्ष - ११
दिनांक : 20/10/2026 मुंबई गुन्हे शाखेची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई; 10 कोटी रुपये किमतीचे 2 किलो हेरॉईन जप्त करून तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक
गु.र.क्र. व कलम : गु.प्र.शा., गु.अ.वि., वि.स्था.गु.र.क्र. 134/2026, कलम 8(क) सह 21(क), 29 एन.डी.पी.एस. कायदा 1985 (बोरिवली पो. ठाणे, गु.र.क्र. 1289/26)
दाखल दिनांक : दिनांक 14/10/2026 रोजी 11.22 वा.
गुन्ह्याचे घटनास्थळ : बोरिवली (प.), मुंबई.
आरोपींची संख्या : 03
जप्त मुद्देमाल व अंदाजे किंमत : एकूण 2032 ग्रॅम वजनाचा गर्द (हेरॉईन), किंमत रुपये 10,16,00,000/- किमतीचे हेरॉईन जप्त.
रुपये 30,000/- किमतीचे तीन मोबाईल जप्त.
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई सो. यांचे आदेशान्वये मुंबई शहरामध्ये अमली पदार्थांची तस्करी तसेच खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण 1, गुन्हे शाखा, मुंबई यांच्याद्वारे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सदर मोहिमेदरम्यान दिनांक 14/10/2026 रोजी कक्ष 11, गु.प्र.शा., गु.अ.वि., कांदिवली (प.), मुंबई येथे प्राप्त झालेल्या गोपनीय बातमीद्वारे पोलीस पथकाने तात्काळ व प्रभावीपणे कारवाई करून दोन इसमांच्या ताब्यातील एकूण 758 ग्रॅम वजनाचे “हेरॉईन”, अंदाजे किंमत रुपये 3,79,00,000/- किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यानंतर दिनांक 17/10/2026 रोजी अटक आरोपींच्या तपासादरम्यान प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तात्काळ व प्रभावीपणे कारवाई करून तिसऱ्या आरोपीच्या ताब्यातून एकूण 1274 ग्रॅम वजनाचा गर्द (हेरॉईन), अंदाजे किंमत रुपये 6,37,00,000/- किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींकडून एकूण 2032 ग्रॅम वजनाचे “हेरॉईन”, अंदाजे किंमत रुपये 10,16,00,000/- किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात कक्ष-11 च्या पोलीस पथकाला यश आले आहे.
सदर प्रकरणामध्ये गु.प्र.शा., गु.अ.वि., वि.स्था.गु.र.क्र. 134/2026, कलम 8(क) सह 21(क), 29 एन.डी.पी.एस. कायदा 1985 (बोरिवली पो. ठाणे, गु.र.क्र. 1289/26) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीस हेरॉईन या अमली पदार्थाची तस्करी केली म्हणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात हेरॉईन तस्करी करणाऱ्या परराज्यातील टोळीचा सहभाग दिसून येत असून अमली पदार्थ पुरवठा करणारे तसेच त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मा. श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री. नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण 1, गुन्हे शाखा, मुंबई व सहायक पोलीस आयुक्त, मुंबई
श्री. सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 11, मुंबई अंतर्गत कांदिवली युनिट येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत जगदाळे, पोनि. बाबासाहेब काकडे, पोनि. विश्वास पाटील, सपोनि. बनसोडे, मसपोनि. सरला थोरात, पोउनि. शिंदे, स.फौ. गायकवाड, पोह. चोरमले, खांडेकर, खताते, गोवळकर, शिंदे, चव्हाण, जाधव, मपोह. लाडे, पोहचा. सानप, वारिक, पोशि. वरठा, वळतकर, मपोशि. गोसावी यांनी केली आहे.
Most Popular News of this Week
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण),...
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
मुंबई पोलिस - “ड्रग फ्री...
दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल, २१ फरार व...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न दि. १७/१०/२०२६ रोजी २३:३० वा....
खंडणी उकळणाऱ्या महिलेस...
अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करून ४ कोटी रुपयांची खंडणी...
मुंबई गुन्हे शाखेची अमली...
दिनांक : 20/10/2026 मुंबई गुन्हे शाखेची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई;...
