गुन्हेगारी
खंडणी उकळणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा कक्ष-७ कडून गुन्ह्याचा पर्दाफाश..
खंडणी उकळणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा कक्ष-७ कडून गुन्ह्याचा पर्दाफाश..
अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करून ४ कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा कक्ष-७ कडून अटक...
घाटकोपर विभागात राहणारे एका तक्रारदारास अश्लील व्हिडिओद्वारे बदनामी करण्याची धमकी देऊन, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सुमारे ४ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी आणि आणखी खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका महिलेस गुन्हे शाखा, कक्ष-७ च्या पथकाने अटक केली आहे.
तक्रारदार हे सोने-चांदीच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असून, डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ च्या दरम्यान त्यांच्या परिचयाच्या एका महिलेने त्यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ चॅटिंग करून त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन सदर अश्लील व्हिडिओ चॅटिंग हे इंटरनेटच्या माध्यमातून पोलिसांना, न्यायालयाला आणि सी.बी.आय या विभागांना मिळाले असून त्यांच्या चौकशीमध्ये तिला बोलवण्यात आल्याचे तक्रारदार यांना सांगितले. या धमकीमुळे तक्रारदार यांनी बदनामीच्या भीतीपोटी सन २०२४ पासून ते अद्याप पर्यंत ४ रुपये करोड एवढी रक्कम तक्रारदार यांच्याकडून घेतलेली असून
सदर महिला ही आणखी रकमेची मागणी तक्रारदाराकडे केली. तसेच आणखी रक्कम न दिल्यास तक्रारदार यांना हातपाय तोडण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देखील नमूद महिलेने दिलेली आहे.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील खंडणी मागणाऱ्या महिलेस गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष ७, घाटकोपर, मुंबई यांनी सापळा रचून दिनांक १९/१०/२०२६ रोजी यातील तक्रारदार यांच्याकडून रुपये ५ लाख इतकी खंडणीची रक्कम स्वीकारताना आर. के. रेस्टॉरंट, एल.बी.एस रोड, घाटकोपर पश्चिम, मुंबई या ठिकाणी रंगेहाथ ताब्यात घेतले व तक्रारदार यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १२५३/२०२६ कलम ३०८(२), ३०८(५) भा.न्या.संहिता अन्वये दाखल करून सदरचा गुन्हा तपासावर घेण्यात आलेला आहे व नमूद महिलेस वरील नमूद गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास गु. प्र. शा., कक्ष ७, घाटकोपर युनिट यांच्याकडून करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कांत उपाध्याय, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. नवनाथ ढवळे, मा. सहायक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) श्री. धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
कक्ष-७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अनिल ढोले, पो.नि. श्री. प्रदीप सरफरे, स.पो.नि. धनाजी साठे, स.पो.नि. महेश शेलार, पो.उ.नि. अजय गोळ्हार, पो.उ.नि. नामदेव परबळकर, पो.हवा. ०३-४६७/गलांडे, पो.हवा. ०३-८३५/जाधव, पो.हवा. ०६-१९४०/राऊत, पो.हवा. ०८-०८७२/होनमाने, पो.हवा. ०९-०५७२/पाटील, पो.शि. ११-०७२७/सावदेकर, पो.शि. १९-०३८०/गोरडे, म.पो.शि. १८-१३१३/शिंदे, म.पो.शि. १८-१४६८/मयेकर, चा.स.फौ. ९६-१६४१/बाळासाहेब कवडे यांनी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण),...
Oct 20, 2026
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
मुंबई पोलिस - “ड्रग फ्री...
Oct 19, 2026
दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल, २१ फरार व...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा...
Oct 19, 2026
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न दि. १७/१०/२०२६ रोजी २३:३० वा....
खंडणी उकळणाऱ्या महिलेस...
Oct 21, 2026
अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करून ४ कोटी रुपयांची खंडणी...
मुंबई गुन्हे शाखेची अमली...
Oct 21, 2026
दिनांक : 20/10/2026 मुंबई गुन्हे शाखेची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई;...
