वरळी वाहतूक डिव्हिजन - मुंबई सामाजिक कार्य....
दिनांक: ९/९/२०२६ रोजी दुपारी ३.०० वा. पोद्दार जंक्शन वरळी. इथून ऑईलने भरलेला टँकर गेला असता त्यातील बरेचसे ऑइल हे रस्त्यावर पडले होते.
त्यामुळे वाहतुकीसाठीच्या बऱ्याच समस्या होत होत्या ट्रॅफिक मुळे सर्व गोंधळ होत होता. अशा वेळी ड्युटी वर असणारे वरळी वाहतूक डिव्हिजनचे हवालदार श्री. जावेद सय्यद नावलगी (पो. ह . क्र. १५०७३५) व हवालदार श्री. अजय उत्तम चव्हाण (पो. ह . क्र. १५१०४३) यांच्या निदर्शनास ही समस्या येताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब मातीचा बंदोबस्त करून ती, माती रस्त्यावर पसरण्यास सुरुवात केली.
त्यांनी वेळीच तत्परता दाखविल्यामुळे पुढील होणारा मोठा अपघात टळला हवालदार जावेद नावलगी आणि त्यांच्या टीमने वेळोवेळी असे धाडसी काम केलेले आहे. याआधी हवालदार जावेद नावलगी यांनी तत्परता व हुशारी दाखवून असेच काम केले होते हवालदार जावेद नावालगी आणि अजय चव्हाण यांनी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.
तसेच जावेद नावलगी आणि अजय चव्हाण अशा पोलीस जवानांना सामाजिक पुरस्कार (Reward) देऊन त्यांना गौरवण्यात यावे जेणेकरून पोलीस खात्यातील अशा तरुण जवानांचा उत्साह आणि कामाचा जोश कायम रहावा. आमच्या पोलिस वार्ताहर टीम तर्फे आम्ही त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
पोलीस वार्ताहर (पोलिस बांधवांचा बुलंद आवाज) हे प्रत्येक पोलीस बांधवांच्या कामाची दखल घेत असते...
Most Popular News of this Week
वरळी वाहतूक डिव्हिजन - मुंबई...
दिनांक: ९/९/२०२६ रोजी दुपारी ३.०० वा. पोद्दार जंक्शन वरळी. इथून ऑईलने...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेबाबतगु.र. क्रमांक 29 /2022, कलम...
मरीन ड्राईव्ह पोलीस - मुंबई
मागील 07 वर्षा पासून फरार जाहीरनामा प्राप्त आरोपी पकडले बाबत पोलीस...
