पश्चिम परिमंडळ-२
पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचा कार्यक्रम संपन्न
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध पोलीस ठाण्यांमध्ये तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत बांद्रा, खार, सांताक्रूझ, जुहू तसेच डी एन नगर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी/मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. आज रोजी ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ८० फिर्यादींना सुमारे ₹१,१५,००,०००/- (एक कोटी पंधरा लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला
यामध्ये सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. दीर्घकाळ तपास व न्यायालयीन प्रक्रियेत असलेला मुद्देमाल संबंधित व्यक्तींना परत मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलिस उपायुक्त , पश्चिम परिमंडळ-२, मुंबई यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खार पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Most Popular News of this Week
बोरीवली पोलीस ठाणे मुंबई
जयहिंद,आरोपीतास 20 वर्ष कारावास सजा मिळाले बाबत मा.सत्र न्यायालय, दिंडोशी,...
पश्चिम परिमंडळ-२
पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल...
