अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट गुन्हे शाखा, बृहन्मुंबई

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट गुन्हे शाखा, बृहन्मुंबई

  अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी               युनिट गुन्हे शाखा, बृहन्मुंबई

‎“कोडेन कफ सिरप” या अंमली पदार्थासह एका इसमास गजाआड केल्याबाबत.

‎कक्ष : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, गु.शा., गु.अ.वि., मुंबई.
‎गु.र.क्र. व कलम : अं.प.वि.कक्ष गु.र.क्र. ९८/२०२६ ‎(चेंबूर पोलीस ठाणे गु.र.क्र. १२९३/२०२६) कलम ८ (क) सह २२ (क) एन. डी. पी. एस. ॲक्ट - १९८५.

‎गुन्हा घडला दिनांक : दिनांक २५/१०/२०२६ रोजी ०२.२० वाजता ते ०४.३० वाजताच्या दरम्यान.


‎गुन्हा दाखल दिनांक : दिनांक २५/१०/२०२६ रोजी.

‎जप्त मुद्देमाल व मूल्य : किं.अं.रु. ७५,०००/- मूल्याच्या

   ‘कोडेन कफ सिरप’ हा अंमली पदार्थ असलेल्या व १०० मि.ली. वस्तुमानाच्या एकूण ७५ बाटल्या. ‎अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटचे पथक मुंबई शहरातील अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणारे इसमांचा शोध घेत असताना पथकास व्ही.एन.पी. आणि आर.सी. मार्ग जंक्शन मोनोरेल स्टेशनखाली, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई, या ठिकाणी एका इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्याला अटकाव करून त्याचेकडून किं.अं.रु. ७५,०००/- मूल्याच्या एकूण ७५ बाटल्या ‘कोडेन कफ सिरप’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

   ‎सदरची यशस्वी कामगिरी मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मा. श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती पौर्णिमा चौगुले-शृंगी, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, व श्री. सुधीर हिरेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा,
  वरळी युनिटचे प्रभारी पो.नि. संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली, स.पो.नि. किरण वाघ व पथक यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

क्राईम ब्रांच

पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी               युनिट गुन्हे शाखा,...

गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...

दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक   ...