गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे पश्चिम, मुंबई
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक
दिनांक २४/१०/२०२६ रोजी गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे पश्चिम, मुंबई यांना एक इसम त्याच्या वांद्रे पश्चिम, मुंबई येथील घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची अत्यंत खात्रीशीर व गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट ९ यांच्या पथकाने दिनांक २४/१०/२०२६ रोजी पंचांसह सदर घरावर छापा टाकला. त्यामध्ये सदर घरातून १ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा अंदाजे किंमत १,५०,००,०००/- (दीड कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार) रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये एक इसम वय ४० वर्षे यास अटक करण्यात आली आहे. तसेच एक इसम पाहिजे आरोपी आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. नवनाथ ढवळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) श्री. धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रपोनि. सचिन पुराणिक, सपोनि. महेंद्र पाटील, विजय धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक. कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सफौ. सुभाष शिंदे, पोह. राहुल पवार, पोशि. राकेश कदम, रविंद्र वाघमारे, मपोशि. पुनम जगताप यांनी केली.
Most Popular News of this Week
गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक ...
