भांडुप पोलीस ठाणे, मुंबई
भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध केलेबाबत
पूर्व परिमंडळ-३ अंतर्गत भांडुप पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नितेश व्यंकट अनभुले, वय-२८ वर्षे याचेविरुद्ध भांडुप, पार्कसाईट व पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, जबरी चोरी, बलात्कार यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.
सदर इसमाच्या सातत्यपूर्ण गंभीर गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. नमूद आरोपीत इसमाविरुद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले.
सदर इसमाच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी भांडुप पोलीस ठाणेमार्फत महाराष्ट्र विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम-१९८१ (MPDA ACT) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त सो., बृहन्मुंबई यांचेकडे सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाची सखोल छाननी करून मा. पोलीस आयुक्त सो., बृहन्मुंबई यांनी दिनांक १३/११/२०२६ रोजी नितेश व्यंकट अनभुले यास विहित कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले. त्यानुसार दि. १४/११/२०२६ रोजी भांडुप पोलीस ठाणेचे पथकाकडून त्यास ताब्यात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे.
सदरची कामगिरी श्री. देवेन भारती मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. मनोजकुमार शर्मा, मा. पोलीस सह-आयुक्त (का. व सु.), श्री. धनंजय कुलकर्णी, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. अभयसिंह देशमुख मा. पोलीस उप आयुक्त (पूर्व परिमंडळ-३),
श्री. अनय जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, भांडुप विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्रीमती सपना क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विनायक जाधव, सपोनि दीपक दळवी, प्रतिबंधक अधिकारी, पोउपनि विष्णू शिंदे, पोह/निलेश सावंत, पोह/श्रीकांत माळी, पोह/संदीप परदेशी, पोशि/संतोष कातोरे, पोशि/मंगेश सिंगल, पोशि/महादेव गायकवाड यांनी सदरची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
Most Popular News of this Week
आझाद मैदान पोलीस, ठाणे - मुंबई
Nov 24, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी नागरिकांकडून जबरीने रोख रक्कम हिसकावून...
नाम.जोशी. पोलिस ठाणे, गुन्हे...
Nov 23, 2026
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय ...
अँटी नार्कोटिक सेल (ANC)
Nov 24, 2026
अंमली पदार्थ विरोधी कारवाईकरिता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज विशेष...
