आझाद मैदान पोलीस, ठाणे - मुंबई
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी नागरिकांकडून जबरीने रोख रक्कम हिसकावून फरार झालेल्या आरोपींना अटक करून १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणले बाबत...
आझाद मैदान पोलीस ठाणे गु.र.क्र. ३५५/२०२६ कलम ३०९ (४), ३१९, ३१७ (५), २४९, ३ (५) भा.न्या.सं.
गुन्हा घडला दिनांक व वेळ :- २०/११/२०२६ रोजी १५:१० ते १५:३५ वा. चे दरम्यान
गुन्हा दाखल दिनांक व वेळ :- २०/११/२०२६ रोजी २३:१९ वा.
गुन्हा घडला दिनांक व वेळ :- २०/११/२०२६ रोजी १५:१० ते १५:३५ वा. चे दरम्यान
गुन्हा दाखल दिनांक व वेळ :- २०/११/२०२६ रोजी २३:१९ वा.
- गुन्ह्याची थोडक्यात हकीकत -
यातील फिर्यादी महिला नामे दारसिला, मारजानदापक, एन जामेना, देश- चाड, मध्य आफ्रिका येथील परदेशी नागरिक असून त्या मुंबई येथे येऊन त्यांचे परदेशी मैत्रिणीसह रोख रक्कमेच्या बॅग सह धनजी स्ट्रीट ते कुलाबा असा टॅक्सीने प्रवास करत असताना यातील आरोपींनी त्यांचा धनजी स्ट्रीट येथून स्कूटर वरून पाठलाग करून मेट्रो सिनेमा जवळ टॅक्सी चालकास आम्ही पोलीस आहोत असे सांगून टॅक्सी थांबवून फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीस पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील रोख रकमेच्या बॅग जबरीने हिसकावून फरार झाले म्हणून उपरोक्त प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
- गुन्ह्याचा तपास -
मा. अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई श्री. बलकवडे सर, मा. पोलिस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ- १, श्री. कलवानिया सर, स पो आ आ. मै. विभाग श्री. निलेश बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पो नि श्री. बिडकर, पो नि श्री. पवार, पो नि श्री. जाधव यांनी तपासकामी सूचना देऊन तात्काळ वेगवेगळी पथके रवाना करून तपास सुरू केला.
अज्ञात आरोपीचा गुप्तबातमीदाराद्वारे शोध सुरू असताना प्राप्त फुटेज द्वारे व तांत्रिक तपासाच्या आधारे चेंबूर, कळवा, ठाणे व अहिल्यानगर परिसरात तपास करून ४८ तासांत टाकळी ढोकेश्वर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरीने चोरीस गेलेली सर्व रक्कम रु. ९७,५०,०००/- हस्तगत करण्यात आलेली आहे.
आझाद मैदान पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १००% मालमत्ता हस्तगत करून विदेशी नागरिकांचे संदर्भातील जबरी चोरीचा गुन्हा मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली उघडकीस आणून सदरची विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी ही श्री. शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, श्री. मनिष कलवानिया, पोलीस उप आयुक्त, दक्षिण परीमंडळ ०१, मुंबई, मा. श्री. निलेश सिताराम बागुल, सपोआ आझाद मैदान विभाग, मुंबई, वपोनि श्री. राजु भागुजी बिडकर, पोनि (गुन्हे) श्री. अमृत लक्ष्मण पवार, पोनि श्री. नंदकिशोर नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
-: तपास पथक :-
१) सपोनि दिगंबर कोकाटे
२) सपोनि लिलाधर पाटील
३) सपोनि कन्हैया शिंदे
४) पोउनि अझरुद्दिन शेख
५) मपोउनि काजल पानसरे
६) पोउपनि अभिजीत माने
७) पोहक्र. ०७३७४४/ राजेंद्र कटरे
८) पोहक्र ०८०२८२/ लालसिंग राठोड
९) पोहक्र ०९०२४९/ सोमनाथ घुगे
१०) पोहक्र ०९१९४९/ ज्ञानेश्वर मुंढे
११) पोहक्र ००७३७/ राजेंद्र गायकवाड
१२) पोशि १७१३२७/ शितल बंडगर
१) सपोनि दिगंबर कोकाटे
२) सपोनि लिलाधर पाटील
३) सपोनि कन्हैया शिंदे
४) पोउनि अझरुद्दिन शेख
५) मपोउनि काजल पानसरे
६) पोउपनि अभिजीत माने
७) पोहक्र. ०७३७४४/ राजेंद्र कटरे
८) पोहक्र ०८०२८२/ लालसिंग राठोड
९) पोहक्र ०९०२४९/ सोमनाथ घुगे
१०) पोहक्र ०९१९४९/ ज्ञानेश्वर मुंढे
११) पोहक्र ००७३७/ राजेंद्र गायकवाड
१२) पोशि १७१३२७/ शितल बंडगर
Most Popular News of this Week
नाम.जोशी. पोलिस ठाणे, गुन्हे...
Nov 23, 2026
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय ...
आझाद मैदान पोलीस, ठाणे - मुंबई
Nov 24, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी नागरिकांकडून जबरीने रोख रक्कम हिसकावून...
अँटी नार्कोटिक सेल (ANC)
Nov 24, 2026
अंमली पदार्थ विरोधी कारवाईकरिता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज विशेष...
