भांडुप पोलीस ठाणे, मुंबई

भांडुप पोलीस ठाणे, मुंबई

भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध केलेबाबत


    ‎पूर्व परिमंडळ-३ अंतर्गत भांडुप पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नितेश व्यंकट अनभुले, वय-२८ वर्षे याचेविरुद्ध भांडुप, पार्कसाईट व पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, जबरी चोरी, बलात्कार यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.

‎ सदर इसमाच्या सातत्यपूर्ण गंभीर गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. नमूद आरोपीत इसमाविरुद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले.

‎ सदर इसमाच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी भांडुप पोलीस ठाणेमार्फत महाराष्ट्र विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम-१९८१ (MPDA ACT) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त सो., बृहन्मुंबई यांचेकडे सादर करण्यात आला होता.

   ‎सदर प्रस्तावाची सखोल छाननी करून मा. पोलीस आयुक्त सो., बृहन्मुंबई यांनी दिनांक १३/११/२०२६ रोजी नितेश व्यंकट अनभुले यास विहित कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले. त्यानुसार दि. १४/११/२०२६ रोजी भांडुप पोलीस ठाणेचे पथकाकडून त्यास ताब्यात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे.

‎  सदरची कामगिरी श्री. देवेन भारती मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. मनोजकुमार शर्मा, मा. पोलीस सह-आयुक्त (का. व सु.), श्री. धनंजय कुलकर्णी, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. अभयसिंह देशमुख मा. पोलीस उप आयुक्त (पूर्व परिमंडळ-३),

  श्री. अनय जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, भांडुप विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्रीमती सपना क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विनायक जाधव, सपोनि दीपक दळवी, प्रतिबंधक अधिकारी, पोउपनि विष्णू शिंदे, पोह/निलेश सावंत, पोह/श्रीकांत माळी, पोह/संदीप परदेशी, पोशि/संतोष कातोरे, पोशि/मंगेश सिंगल, पोशि/महादेव गायकवाड यांनी सदरची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Most Popular News of this Week

बांगुरनगर पोलिसांनी केला...

बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रुपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम...

उत्तर परिमंडळ - १, मुंबई...

उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या...

भांडुप पोलीस ठाणे, मुंबई

भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये...

पवई पोलिस ठाणे, मुंबई

पवई पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा साठा करून...